Ajit Pawar News : ताफा थांबवत अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले अजित पवार

Baramati Loksbha : कन्हेरी येथे अजित पवारांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. पवार कुटुंबीय 1967 पासून कन्हेरी येथील मारुतीच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराला प्रारंभ करतात.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवला. तसेच अपघातग्रस्ताला तत्काळ मदत देत आपल्या ताफ्यातील गाडीतून रुग्णालयात पाठवले. तसेच त्यांनी डाॅक्टरांना उपचाराच्याही सूचना दिल्या.

Ajit Pawar
Ajit Pawar News : अजित पवारांनी इंदापुरात केलेल्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल; कारवाई होणार?

सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीतासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगावकडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक होऊन तावरे खाली पडले. त्यानंतर काही वेळातच तिथून कन्हेरीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली गाडी थांबवण्याच्या सूचना चालकाला दिल्या. हे तर रामभाऊ, असं म्हणत तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत तावरे यांना बसवले. सोबत काही लोक दिले आणि दवाखान्यात पाठवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अशातही क्षणाचा विलंब न लावता अजित पवार स्वतः पुढे येत माणुसकी दाखवली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांनादेखील रामभाऊ तावरे यांच्या उपचाराबाबत कळवले. देवकाते पती पत्नीला काळजीचे काही कारण नाही असं सांगत दिलासा दिला.

कन्हेरी येथे अजित पवारांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. पवार कुटुंबीय 1967 पासून कन्हेरी येथील मारुतीच्या मंदिरात नारळ फोडून प्रचाराला प्रारंभ करतात. सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे प्रचाराचा नारळ फोडला, तर आज (शनिवारी) सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. या वेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव जय पवार हेदेखील उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

R

Ajit Pawar
Loksabha Election 2024 : हातकणंगलेत माने-पाटलांचं 'या' उमेदवारांनी वाढवलं टेन्शन; 'सेम टू सेम' नावाने घोळ होणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com