Sharad Pawar : लोकसभा निकालानंतर बारामती व्यापारी संघटनेचा नूर बदलला...

Baramati Politics : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर बारामतीत अजित पवार आणि शरद पवार अशी दोन 'पॉवर' केंद्र तयार झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांवर भावनिक दडपण होते.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Baramati Political News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीत गोळाबेरीज सुरू केली होती. त्यातून त्यांचा बारामतीतील व्यापाऱ्यांशी संवादाचे नियोजन केले होते. मात्र ऐनवेळी हा संवाद कॅन्सल करण्यात आल्याने त्यास राजकीय वास असल्याची चर्चा राज्यभर झाली. आता लोकसभेत मोठे यश मिळवल्यानंतर मंगळवारी व्यापाऱ्यांनी पवारांच्या मेळाव्याचे आयोजन केले. यामुळेही विविध चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर बारामतीत अजित पवार Ajit Pawar आणि शरद पवार अशी दोन 'पॉवर' केंद्र तयार झालेली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी नणंद भावजय लढत झाली. दोन्ही बाजूने बारामतीकरांना मतदानासाठी विविध मार्गांनी साद घातली जात होती. परिणामी बारामतीकरांवर वेगळेच भावनिक दडपण आले होते.

निवडणुकीत बाजी मारण्यासाठी दोघांनीही प्रत्येक घटकाशी संवाद साधण्यावर भर दिला. याचाच एक भाग म्हणून शरद पवारांनी शहरातील व्यापारी वर्गाशी संवाद साधण्याचे नियोजन केले होते. मात्र नियोजित मेळावा ऐनवेळी कॅन्सल करण्यात आला. परिणामी त्यामागे राजकीय शक्ती असल्याचा दावा करण्यात आल्याचे आरोपही झाले. व्यापारी संघटनांच्या या निर्णयामुळे बारामतीकर चांगलेच चिडले होते. यावर राज्यातूनही विविध प्रतिक्रया उमटल्या होत्या.

आता बारामतीत सुप्रिया सुळे Supriya Sule दीड लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यानंतर वातावरण फिरल्याने मंगळवारी व्यापाऱ्यांनी शरद पवारांच्या मेळावा आयोजित केल्याचे बोलले जात आहे. याबाबत बारामती मर्चंट असोशिएशनचे संभाजी किर्वे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना निवडणुकीपूर्वी मेळाव्याबाबतची सर्व चर्चा गैरसमजातून झाल्याचा दावा केला आहे.

Sharad Pawar
Maharashtra Assembly Election : लोकसभेचा इम्पॅक्ट विधानसभेतही; महाराष्ट्रात सत्तांतर होणार?

किर्वे म्हणाले, बारामतीत मर्चंट असोशिएशन आणि व्यापारी महासंघ अशा दोन व्यापारी संघटना असून त्या एकत्रच काम करतात. दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड झाल्याने मेळावा पार पडला होता. त्याचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या काही विधाने केली होती.

त्या मेळाव्यानंतर शरद पवारांसाठीही मेळाव्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. मात्र वेळेअभावी आणि काही पदाधिकारी बाहेरगावी गेल्याने तो मेळावा होऊ शकला नाही. त्याबाबत पवारांना तोंडी कळवून वेळ वाढवून मागितली होती. त्याचा मात्र सत्तासंघर्षातून वेगळे अर्थ काढून चुकीच्या चर्चा झाल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता झालेल्या सभेत सर्व गैरसमज दूर झाल्याचेही किर्वे यांनी स्पष्ट केले. आजच्या मेळाव्यात पवारांनी झाले ते सोडून द्या, असे म्हणत व्यापारी संघटनात राजकारण आणू नये, असे सांगितले. राजकारणात काही होईल ते होईल, मात्र लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला एकत्रित काम करायचे आहे, असेही पवारांनी सूचवले. या संवादामुळे काही प्रमाणात का होईना झालेला गैरसमज कमी होण्यास मदत झाली, असेही किर्वे म्हणाले.

Sharad Pawar
NCP Sharad Pawar : 'होय... जयंत पाटीलच सेनापती!' ; मुंबईतून थेट रोहित पवारांनाच पत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com