
बारामती तालुका पंचायत समितीत नव्याने फेररचना झालेली असल्याने यंदा नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार हे निश्चित आहे. आरक्षणानंतर काही ठिकाणी उमेदवारीसाठी रस्सीखेच, तर काही ठिकाणी सक्षम उमेदवारांचा शोध घेण्याचे दुहेरी काम पक्षांना करावे लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेहमीप्रमाणे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडूनही चाचपणी सुरु झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही निवडणूक लढविली जाईल, असे संकेत आहेत.
मागील निवडणुकीच्या वेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता होती. यंदा दोन राष्ट्रवादी झाल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर यंदा ‘तुतारी’चेही उमेदवार रिंगणात दिसणार का, याचे औत्सुक्य आहे. सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविणार असल्याचे संकेत दिलेले असल्याने घड्याळ विरुध्द तुतारी, अशी ही निवडणूक होणार का, याची उत्सुकता आहे.
शिर्सुफळ, पणदरे, वडगाव निंबाळकर व निंबूत या चार गणात सर्वसाधारण आरक्षण असल्याने सर्वाधिक उमेदवार व रस्सीखेच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चारही भागातील राजकीय घराणी ही सक्षम असल्याने येथे उमेदवार निवडताना नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. आपल्याला संधी मिळावी ती देखील सत्ताधारी पक्षाकडून याचाच प्रयत्न अधिक होणार आहे. ज्यांना संधी मिळणार नाही, ते कदाचित बंडखोरी करून दुसऱ्या पॅनेलमधून निवडणूक लढवू शकतील.
सुपे, काऱ्हाटी व मुढाळे गणात सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे कोणत्या कुटुंबातील महिलेस संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. आपल्या कुटुंबातील महिलेला संधी मिळविण्यासाठी इच्छुकांनी चाचपणी सुरु केली आहे. सुपे गटातील सुपे व कऱ्हाटी गणात व सुपे गटात तिन्ही ठिकाणी महिला सर्वसाधारण उमेदवारांना संधी मिळणार असल्याने तेथे महिलाराज येणार आहे. मोरगाव गणात नागरिकांचा मागास प्रवर्गाचे, तर कांबळेश्वर व डोर्लेवाडीमध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, असे आरक्षण आहे.
नीरावागजमध्ये अनुसूचित जातीचे, तर गुनवडीमध्ये अनुसूचित जाती महिला असे आरक्षण आले. त्यामुळे अनेक दिग्गजांचा पार हिरमोड झाला आहे. या ठिकाणी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शांतता होती. या सर्वच गणामध्ये उमेदवार शोधण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहेत. माळेगाव नगरपंचायत झाल्याने बारामती पंचायत समितीच्या गणांची फेररचना झाली आहे. मागील वेळी असलेले मेडद, माळेगाव, करंजेपूल व सांगवी हे गण बदलले आहेत, तर यंदा नव्याने काऱ्हाटी, मुढाळे, कांबळेश्वर व नीरावागज हे नवीन गण नव्या रचनेनुसार निर्माण केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात काही राजकीय फेरबदलही करावे लागतील.
गणनिहाय आरक्षण गणनिहाय आरक्षण -
सुपे- सर्वसाधारण महिला, काऱ्हाटी- सर्वसाधारण महिला, शिर्सुफळ- सर्वसाधारण, गुनवडी- अनुसूचित जाती महिला, पणदरे- सर्वसाधारण, मुढाळे- सर्वसाधारण महिला, मोरगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, वडगाव निंबाळकर- सर्वसाधारण, निंबूत- सर्वसाधारण, कांबळेश्वर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नीरावागज- अनुसूचित जाती, डोर्लेवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
या विद्यमान सदस्यांना धक्का -
भारत गावडे (गुनवडी- नवीन आरक्षण- अनुसुचित जाती महिला) राहुल भापकर (मोरगाव- नवीन आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग) राहुल झारगड (डोर्लेवाडी- नवीन आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्गी महिला)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.