
पुरस्कार वितरण – बारामती तालुक्यातील मुर्टी-मोढवे येथील पंडिता रमाबाई प्रबोधन संस्थेच्या वतीने दिला जाणारा मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार डॉ. संजय आणि नीता सावंत दांपत्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमातील किस्से व टिपण्ण्या – अजित पवारांनी स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ कोकरे व त्यांचे जावई माजी आमदार विजयराव मोरे यांच्यावरील जुना निवडणुकीचा किस्सा सांगून सभागृहात हशा पिकवला. तसेच त्यांनी “नशीबवान आहात” व “जरा सुसंस्कृत वागा रे” अशा मिश्किल टिपण्ण्या केल्या.
घोषणा व योजना – बारामतीत कॅन्सर हॉस्पिटलसाठी १० एकर जागा निश्चित करून टाटा समूहासोबत चर्चा झाल्याचे सांगितले. नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्पासाठी येत्या अर्थसंकल्पात १,००० कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली.
Someshwarnagar, 28 September : बारामती तालुक्यातील मुर्टी-मोढवे येथील पंडिता रमाबाई प्रबोधन संस्थेच्या यशवंतराव मोरे आश्रमशाळेच्या वतीने दिला जाणारा 'मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. संजय सावंत आणि नीता सावंत दाम्पत्यास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. विजयराव मोरे होते. या कार्यक्रमात अजित पवारांनी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ कोकरे आणि त्यांचे जावई विजयराव मोरे यांच्या आमदारकीचा किस्सा सांगितला.
अजित पवार म्हणाले, देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ कोकरेही त्याच विचारधारेचे होते. ते शरद पवारसाहेबांचे (Sharad Pawar) कट्टर समर्थक. त्या निवडणुकीत कोकरेंचे जावई विजयराव मोरे हे आमदारकीला पवारसाहेबांविरूद्ध उभे राहिले होते. मात्र, जावई-लेकीचे न ऐकता कोकरेंनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार असलेले शरद पवारसाहेबांचा ताकदीने प्रचार केला होती. अशी माणसं आता क्वचित पहायला मिळतात.
नशीबवान आहात
पुरस्कार्थी डॉ. रवींद्र सावंत यांनी, ‘पत्नीने सांसारिक जबाबदाऱ्या पेलल्याने पूर्ण वेळ रूग्णसेवा करू शकलो. अगदी तिने भांडणाचीही संधी मला दिली नाही, असे सांगितले, त्याला टाळ्या पडल्या. त्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar), ‘हे तालुक्यातले एकमेव उदाहरण दिसतेय. नशीबवान आहात!’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. ‘आयुष्यभर चांगलीच कामं केली, तर बायको कशाला भांडेल,’ अशी कोटीही केली.
‘जरा सुसंस्कृत वागा रे..चव्हाणसाहेब वरून बघत असतील’
नीरा-कऱ्हा नदी जोडप्रकल्पाचे काम कुठंवर आलंय? असे काहींनी निवेदनाद्वारे विचारले होते. त्याचा संदर्भात देत अजित पवार म्हणाले, ‘सावंत डॉक्टर तुम्हाला माझी भीती वाटतेय. पण, इथे बघा कार्यकर्ते तर जाब विचारत आहेत. कुठवर आलंय रे? नाय झालं तर बघतोच?’ असे विचारत आहेत. त्यावर हशा झाला आणि पवारांनी ‘जरा सुसंस्कृत वागा रे...यशवंतराव चव्हाणसाहेब वरून बघत असतील,’ अशी मिश्किली टिपण्णीही केली.
टाटासोबत बैठक
अजित पवार म्हणाले, राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. बारामतीत कॅन्सर हॉस्पिटलसाठी जुन्या एसटी वर्कशॉपची दहा एकर जागा निश्चित करण्यात आलेली आहे. टाटांसोबत बैठकही झाली आहे.
सर्वाधिक कामे माझीच दिसतील
बारामतीच्या जिराईत भागासाठी नीरा-कऱ्हा जोडप्रकल्प करण्याकरिता येत्या अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही अजित पवार यांनी केली. आतापर्यंत जेवढे आमदार झाले, जेवढे पुढे होतील, त्या सगळ्यांत माझ्या कारकिर्दीतच सर्वाधिक कामे दिसतील, असा दावाही अजित पवारांनी केला.
थोडी कळ काढा...
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिले असून मुख्यमंत्री आज पंतप्रधानांना भेटायला गेले आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली. मोढवे गावातील सव्वाशे मोकाट गाईंचा प्रश्नही मीच सोडविणार आहे थोडी कळ काढा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्र: ‘मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार’ कोणाला देण्यात आला?
उ: डॉ. संजय सावंत आणि नीता सावंत दांपत्याला.
प्र: बारामतीतील कॅन्सर हॉस्पिटलसाठी कोणती पावले उचलली आहेत?
उ: जुन्या एसटी वर्कशॉपची १० एकर जागा निश्चित करण्यात आली असून टाटा समूहासोबत बैठकही झाली आहे.
प्र: नीरा-कऱ्हा नदी जोड प्रकल्पासाठी किती निधीची तरतूद होणार आहे?
उ: येत्या राज्य अर्थसंकल्पात १,००० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
प्र: अजित पवारांनी कार्यक्रमात कोणत्या ऐतिहासिक किस्स्याचा उल्लेख केला?
उ: स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ कोकरे यांनी आपल्या जावई विजयराव मोरे यांच्या विरोधात शरद पवारांच्या समर्थनार्थ निवडणुकीत केलेल्या प्रचाराचा किस्सा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.