Pune APMC Election: बाजार समिती निवडणुकीला गालबोट; श्री शिवाजी मराठा सोसायटी मतदान केंद्रावर गदारोळ

Pune Bazar Samiti Election: पुणे बाजार समिती निवडणुकीसाठी एकुण 18 जागांसाठी 17 हजार 812 जण मतदान करणार आहेत.
Pune APMC Election 2023:
Pune APMC Election 2023:Sarkarnama

Pune Krushi Utpanna Bazar Samiti Election 2023 : ग्रामीण अर्थकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पण पुण्यात शिवाजी मराठा सोसायटी मतदान केंद्रावर मतदारांचा गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. उमेदवारांनी बोगस मतदान करत असल्याचा आरोप केल्याने मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची एकच गर्दी झाली होती. पण पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा मतदान प्रक्रिया पुन्हा सुरु झाली. ( APMC Election)

पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या १४३ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून या ३२१ जण या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.पुणे जिल्ह्यातील हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, मंचर, खेड, जुन्नर, नीरा या आठ बाजार समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार या दोन पॅनलमध्ये लढत होत आहे.

Pune APMC Election 2023:
Jalgaon APMC Election : शिंदे गटाकडून बोगस मतदान सुरु असल्याचा आरोप; जळगावात मतदान केंद्रावर राडा

विशेष म्हणजे,आठ बाजार समित्यांच्या १४३ उमेदवारापैकी नऊ उमेदवार बिनविरोध निवड झाली आहे. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही तब्बल २० वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच होत आहे.हवेलीसह अन्य सर्वच बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढत होत आहे. तर बारामती येथील बाजार समितीचा अपवाद वगळता उर्वरित सर्व बाजार समितीत संचालक मंडळाच्या एकूण प्रत्येकी १८ जागा आहेत.बारामतीत मात्र १७ जागा आहेत. (Haveli APMC Elelction)

पुणे बाजार समिती निवडणुकीसाठी एकुण 18 जागांसाठी 17 हजार 812 जण मतदान करणार आहेत. सर्वाधिक सेवा सहकारी संस्था गटातून 11 उमेदवार निवडून येणार आहेत. याबरोबरच ग्रामपंचायात गटातून 4, व्यापारी/आडते गटातून 2 आणि हमाल मापाडी गटातून 1 उमेदवार विजयी होणार आहेत.

Pune APMC Election 2023:
APMC Elections News : बाजार समितीच्या निवडणुकीत राडा ; दोन गट भिडले, भाजपची बस थेट मतदान केंद्रावर..

ठळक मुद्दे

तब्बल १९ वर्षानंतर होतेय हवेली बाजार समितीची निवडणूक

एकूण जागा १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात

सेवा सहकारी मतदारसंघातील ११ जागांसाठी २९ उमेदवार

ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ जागांसाठी ११ उमेदवार

व्यापारी-अडते गटातील २ जागांसाठी १२ उमेदवार

हमाल-तोलणार गटातील एका जागेसाठी ५ उमेदवार

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com