Bhigwan case : भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेखच्या काकाला अटक : आणखी दोन जुनी प्रकरणे समोर; नेमकं काय गौडबंगाल?

Bhigwan suspect uncle arrested : भिगवण प्रकरणात मोठी घडामोड! संशयित आरोपीच्या काकाला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर अपडेट.
Bhigwan case : भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेखच्या काकाला अटक : आणखी दोन जुनी प्रकरणे समोर; नेमकं काय गौडबंगाल?
Published on
Updated on

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अझर शेख याला अटक केली असून या कारवाईनंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. अझर शेख हा स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच आहे. त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हा दाखल असून तो अनेक वर्षांपासून फरार होता. भिगवण प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचा आरोप समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अझर शेख हा भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा चुलता आहे. मात्र, अझर शेख हा दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता आहे. या आरोपांमुळे प्रकरणात राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

Bhigwan case : भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेखच्या काकाला अटक : आणखी दोन जुनी प्रकरणे समोर; नेमकं काय गौडबंगाल?
DA Hike Pensioners : सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता पेन्शनर्सना सरकारचं मोठं गिफ्ट! महागाई भत्ता 257 टक्क्यांवर, जाणून घ्या कधीपासून मिळणार लाभ

दरम्यान, अझर शेखसोबत युवराज मेंगावडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अझर शेखवर यापूर्वी अवैध वाळू उपसा प्रकरणात स्वामी चिंचोली येथील महसूल विभागाच्या तलाठ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी आता त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू केली आहे.

भिगवण प्रकरण नेमकं काय?

भिगवण प्रकरणाची सुरुवात मात्र एका कथित अपहरण प्रकरणातून झाली होती. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे 21 वर्षीय तरुणी आई आणि भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेली असताना, काही अज्ञातांनी तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

मात्र तपासादरम्यान वेगळीच माहिती समोर आली. संबंधित तरुणीने न्यायालयात दिलेल्या जबाबात आपण स्वतःच्या इच्छेने एका तरुणासोबत गेलो असल्याचे स्पष्ट केले. त्या तरुणावर आपले प्रेम असल्याचेही तिने सांगितले. शिवाय आई आणि भावाने दिलेली तक्रार खोटी असल्याचा दावा करत तिने प्रतिज्ञापत्रही सादर केले.

Bhigwan case : भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेखच्या काकाला अटक : आणखी दोन जुनी प्रकरणे समोर; नेमकं काय गौडबंगाल?
Ajit Pawar Plane Crash Update: नेमकं काय घडलं 'त्या' काही सेकंदात? अजितदादांच्या विमान अपघातात तांत्रिक बिघाड की घातपात? 'मिस्ट्री' उलगडणार!

सुरुवातीला न्यायालयात तिने प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु नंतर इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीत तिने आपला जबाब बदलत आईसोबत राहण्याची तयारी दर्शवली. या बदललेल्या भूमिकेमुळे प्रकरण अधिकच गोंधळात टाकणारे ठरले आहे.

सध्या पोलिसांनी संबंधित तरुण आणि इतर संशयितांना ताब्यात घेतले असून तरुणीला सुरक्षिततेच्या कारणास्तव सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. अझर शेखच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणातील राजकीय आणि कौटुंबिक गुंतागुंत अधिक ठळकपणे समोर येत आहे. पुढील तपासात नेमके कोणते गौडबंगाल उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com