Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंनी वाढवला भोसरीचा तिढा; शरद पवार राजी होणार का?

Sharad Pawar Bhosari Assembly Election Shiv Sena NCP BJP Mahesh Landge : भोसरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune : भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी भोसरी विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकावण्याचा नारा देत हा मतदारसंघ आपल्याकडेच असेल असे सूचक संकेतही दिले. असे असले तरी त्यांनी भोसरीचा तिढा अधिक वाढवल्याची चर्चा आहे. त्यांच्याच पक्षात आता उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच तर असेलच, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजी करण्यात त्यांना यश मिळणार का, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

भोसरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे भाजपचे उमेदवार असतील. मागील विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांना सुमारे 1 लाख 60 हजार मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे होते. त्यांना जेमतेम 81 हजार मते मिळाली. तब्बल 77 हजारांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

2014 मध्ये महेश लांडगेंनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांना केवळ 60 हजार मते मिळाली होती. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे, भाजपचे एकनाथ पवार, काँग्रेसचे हनुमंतराव भोसले उभे होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली. या निवडणुकीत उबाळे 44 हजार 857 मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होत्या.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Modi Government : मोदी सरकारची माघार; राहुल गांधींसह केंद्रीय मंत्र्यांच्याच विरोधानंतर घेतला मोठा निर्णय

2024 मध्ये महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. भाजपकडून लांडगे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्यासोबत यावेळी शिंदेंची शिवसेना आहे. पण त्यांची फारशी ताकद नाही. रवी लांडगेंच्या प्रवेशामुळे ठाकरेंची ताकद आणखी वाढली आहे. या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही ताकद आहे.  

उबाळे, गव्हाणे की लांडगे?

ठाकरेंच्या शिवसेनेत उबाळे आणि नुकत्याच दाखल झालेल्या रवी लांडगेंमध्ये रस्सीखेच असेल. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित गव्हाणे इच्छूक आहेत. मागील निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. त्यामुळे पवारसाहेबांच्या पक्षाचा दावा सध्यातरी मजबूत असेल. पण लोकसभेप्रमाणे काही जागांची अदलाबदल करून भोसरी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरेही ताकद लावतील यात शंका नाही.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Mayawati : मायावतींनी रणनीती बदलली; 21 तारखेच्या भारत बंदबाबत BSP चा मोठा निर्णय

भोसरीमध्ये अनेक वर्षांपासून लांडे आणि लांडगे कुटुबीयांचे वर्चस्व आहे. विलास लांडे अजितदादांसोबत आहेत. त्यामुळे महेश लांडगे यांच्याविरोधात रवी लांडगे यांना उमेदवारी मिळाल्यास ही लढत रंगतदार ठरू शकते. उबाळे यांनीही 2014 च्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली होती. यावेळी ठाकरेंची शिवसेना शरद पवारांसोबत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना या मतदारसंघातून केवळ नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. मागील निवडणुकीत हा आकडा 37 हजार एवढा होता.

आता रवी लांडगे यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला त्याचा फटका बसू शकतो. परिणामी, महेश लांडगे यांना यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात चांगलाच घाम गाळावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्यातरी महाविकास आघाडीत या जागेचा तिढा कसा सुटणार, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com