Mayawati : मायावतींनी रणनीती बदलली; 21 तारखेच्या भारत बंदबाबत BSP चा मोठा निर्णय

UP Politics SC ST Reservation Bharat Bandh : मायावती यांच्या पक्षाची मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावरून उतरून आंदोलन न करण्याची रणनीती होती.
Mayawati, Akash Anand
Mayawati, Akash AnandSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh : सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणास मान्यता दिली आहे. त्या निर्णयावरोधात देशभरातील अनेक संघटनांनी 21 ऑगस्टला भारत बंदची घोषणा केली आहे. या बंदला मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे प्रामुख्याने उत्तर भारतात बंदला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

बसपा सुप्रिमो मायावती यांच्या पक्षा मागील काही वर्षांत पहिल्यांदाच भारत बंदच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार आहे. बसपची रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची रणनीती नाही. कांशीराम यांनीही राजकारणात आपला दबदबा निर्माण करून लोकांची सेवा करण्यासाठी बसपला बळकट करण्याचा प्रयत्न केला होता. हेच धोरण अवलंबत मायावती यांनीही कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन न करता थेट लोकांना मदतीची भूमिका घेतली होती.

Mayawati, Akash Anand
Kolkata Rape Murder Case : केवळ कोलकाताच नव्हे तर संपूर्ण देशात..! सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले

यावेळी मात्र बसपने भारत बंदला पाठिंबा देत आपली रणनीती बदलली असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मायावतींचे उत्तराधिकारी आणि बसपाचे समन्वयक आकाश आनंद यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात एससी आणि एसटी समाजात प्रचंड राग आहे. त्यांनी 21 ऑगस्टला भारत बंदचे आवाहन केले आहे.

आज आपल्या स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे. त्याला 21 ऑगस्टला शांतपणे जोरदार उत्तर द्यायचे आहे, असे म्हणत आकाश आनंद यांनी अप्रत्यक्षपणे कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केल्याचे मानले जात आहे. बसपचे महासचिव सतीश चंद्र मिश्रा यांनीही कार्यकर्त्यांना भारत बंदमध्ये सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Mayawati, Akash Anand
Shashi Tharoor : शशी थरूर यांनीच राहुल गांधींना पाडलं तोंडावर’; सरकारच्या निर्णयाला उघड पाठिंबा

दरम्यान, 35 वर्षांपूर्वी 1989 मध्ये पहिल्यांदा बसपने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली मंडल आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होते. त्यानंतर 2016-17 मध्ये बसपच्या कार्य़कर्त्यांनी भाजप नेते दयाशंकर सिंह यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यांनी मायावती यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. विशेष म्हणजे मायावतींनीही लखनऊमध्ये त्यावेळी एक सभा घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com