Eknath Khadse Land Scam: भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंना मोठा धक्का; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Eknath Khadse MIDC Land Scam | खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 3.75 कोटी रुपयांना हा प्लॉट खरेदी केला होता.
 Eknath Khadase
Eknath KhadaseSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadase Land Scam Update : भोसरी एमआयडीसी भुखंड घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा धक्का दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची जामीन याचिका फेटाळली आहे. इतकेच नव्हे तर न्यायालयाने खडसेंना कठोर शब्दांत फटकारलही आहे. (Big blow to Khadse in Bhosari Bhukhand scam case: High Court's big decision)

याचवेळी महसूल मंत्री या नात्याने एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांना सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याचे किंवा निर्णय घेण्याचे अधिकार होते.पण या अधिकारांचा वापर स्वत:च्या वैयक्तिक हितासाठी किंवा कुटुंबियांसाठी किंवा आर्थिक वा अन्य फायदा मिळवण्यासाठी केला जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी करत न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपिठाने गिरीष चौधरी यांची जामीन याचिका फेटाळून लावली.

सादर पुराव्यांच्या आधारे चौधरी यांनी विविध शेल कंपन्यांच्या माध्यमातून ५.५३ कोटी रुपये जमा करुन नंतर ती रक्कम वळतीही केली. या प्रकरणी प्रथमदर्शनी एकथान खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी एमआयडीसीतील जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची जामीन याचिका फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. (Eknath Khadase news)

 Eknath Khadase
PSI Pallavi Jadhav : दबंग महिला पोलीस अधिकारी पल्लवी जाधव; पाहा खास फोटो!

सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी बंड गार्डन पोलिसांत खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भोसरी जमीन घोटाळा (Bhosari Land Scam) प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) व त्यांच्या कुटुंबियांविरोधात १ हजार पानी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, यांची नावे आहेत. या जमीन घोटाळ्यात खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली.

अब्बास उकानी हे या जमिनीचे मूळ मालक होते. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 3.75 कोटी रुपयांना हा प्लॉट खरेदी केला होता. नोंदणी निबंधकांच्या या व्यवहाराची कार्यालयात रीतसर नोंदणीही करण्यात आली. व्यवहारानुसार खडसे कुटुंबीय सरकारी नोंदणीप्रमाणे कागदोपत्री मालकही झाले. (Eknath Khadase news)

 Eknath Khadase
SPPU Viral Rap Song: रॅप साँगला परवानगी देणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्याचीच चौकशी होणार

पण जमनीचा मूळ बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश चौधरी यांनी तो फक्त तीन कोटी रुपयांना कसा विकत घेतला. ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याने ती इतक्या कमी किमतीत कशी काय विकत घेण्यात आली, इतक्या कमी किमतीत व्यवहार कसा झाला, जमीन खरेदी करण्यासाठी चौधरींकडे तीन कोटी कुठून आले, अशा अनेक मुद्द्यावरुन ईडीने तपास सुरु केला होता.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com