SPPU Viral Rap Song: रॅप साँगला परवानगी देणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्याचीच चौकशी होणार

Pune University Viral Rap Song : पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीत अश्लील रॅप साँग शुट केल्याचं उघडकीस आलं आहे.
SPPU Viral Rap Song
SPPU Viral Rap SongSarkarnama

Savitribai Phule Pune University Viral Rap Song: काही दिवसांपूर्वी राम मुंगासे या युवकाने एक रॅप साँग तयार केलं होतं. या रॅप साँगमध्ये 50 खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या युवकाला पोलिसांनी अटक झाली आणि काही दिवसांनी त्याला जामीनही मिळाला.ही घटना ताजी असतानात आता पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही (Pune University) रॅप साँगचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे विद्यापीठातील मु्ख्य इमारतीत अश्लील रॅप साँग शुट केल्याचं उघडकीस आलं आहे. शुभम जाधव नावाच्या मुलाने हे शुट केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यापीठात ज्या ठिकाणी अधिसभा भरते या अधिसभेतील कुलगुरुंच्या खुर्चीत बसुन हे रॅप साँग शुट करण्यात आलं आहे. यात पिस्तुलही आणि दारुची बाटलीही दाखवण्यात आली आहे. या रॅपसाँगसाठी विद्यापिठातील काही कर्मचाऱ्यांनीच परवानगी दिल्याची माहितीही समोर आली आहे. आता ही परवानगी कोणी दिली, त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे. (Political news)

SPPU Viral Rap Song
Sanjay Rathod News : अन्न व औषध प्रशासनवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; मंत्री राठोडांची पहिली प्रतिकिया,म्हणाले...

या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात शुभमवर गुन्हा दाखल झाला आहे. पण अद्याप त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. आता विद्यापीठातील ज्या कर्मचाऱ्यांनी शुटींगची परवानगी दिली त्याच्यांवरही कारवाई करण्यात मागणी होऊ लागली आहे. रॅपसाँग शुट करताना विद्यापीठाच्या आवारात मोठी आग लावण्यात आली होती. आग लावल्यानंतर मोठा गोंधळ उडाल्याने विद्यापीठ प्रशासनाला अग्निशमन दलाला बोलवावं लागलं. सुरुवातीला ही आग कशामुळे लागली हे काही दिवस उघडकीस आलं नाही. पण जेव्हा हे साँग व्हायरल झालं तेव्हा सर्व प्रकार समोर आला.

हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर शुभम जाधव आणि सुरज गुथ्थी यांच्याविरोधात चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांना चौकशीला बोलवलं आणि नंतर सोडूनही दिलं. पण अद्याप त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. सुरज हा विद्यापिठातील कंत्राटी कामे घेतो. तर शुभम जाधव यांच्यावर काय कारवाई करणार यासोबतच विद्यापिठाच्या मुख्य इमारतातीत जाऊन शुट करण्यासाठी परवानगी कोणी दिली, त्यांच्यावर काय कारवाई करणार, त्यांना पाठिंबा कोणी आणि का दिला, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे.

SPPU Viral Rap Song
Sanjay Rathod News: संजय राठोड पुन्हा अडचणीत? अन्न व औषध प्रशासन कार्यालयावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

विशेष म्हणजे विद्यापिठाचे कुलगुरु  डॉ. कारभारी काळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. असे सांगत त्यांनी जबाबदारीही झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता या प्रकरणात परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com