Pune News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. तर अजित पवारांसह एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी पक्षावरही अजित पवारांनी दावा केल्यामुळे राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत. याबरोबरच राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत.
राज्यातील राजकारणात घडणाऱ्या या सर्व घडामोडींबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरच जोरदार निशाणा साधला आहे. "राज्यात जे काही घडत आहे, याची सुरवात शरद पवार यांनीच केली होती आणि शेवटही तेच करतील. राज्यात सध्या अत्यंत किळसवाणे राजकारण सुरु आहे", असं राज ठाकरे म्हणाले. ते आज पुणे दौऱ्यावर आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे म्हणाले, "राज्यात जे काही घडत आहे, याची सुरवात शरद पवार यांनीच केली होती. शरद पवार यांनी फोडाफोडीच्या राजकारणाची सुरवात करत 'पुलोद'चा प्रयोग केला होता. पण त्या आधी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हत. सुरुवात शरद पवार यांनी केली आणि शेवटही तेच करतील. मात्र, सध्या किळसवाणे राजकारण सुरु असून प्रत्येक घरात शिव्या ऐकायला मिळत आहेत ", असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला.
पटेल, भुजबळ, वळसे पाटलांबाबत राज ठाकरे काय म्हणाले?
अजित पवार यांच्या बंडाला प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनीही साथ दिली. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, "प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील ही अजित पवारांबरोबर जाणारी माणसे आहेत, अस मला वाटतं नाही. ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात. ही गोष्ट अचानक घडलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून ही गोष्ट वातावरणामध्ये सुरू होती", असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.