Pune News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या काही मागण्यांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र, आता प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत एक वेगळी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर म्हणाले, 'सर्व जातीधर्माचा सहभाग व्यवस्थेत असावा यासाठी ब्रिटिश काळानंतर घटनेच्या माध्यमातून काही जातींना आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयास नसून तो फक्त संसदेला आहे. एससी, एसटी आरक्षण वर्गीकरणाबाबत सर्वाच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा संविधानाच्या मुळ चौकटीला धक्का देणारा आहे. यामुळे समाज जात-धर्म आधारावर विभागला गेल्याने ज्यापद्धतीने पूर्वी परकीय शक्ती देशात राज्य करु शकल्या ही परिस्थिती पुन्हा येऊ नये, अशी भीती प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केली.
आंबेडकर पुढे म्हणाले, 'दुर्देवाने आरक्षण हे विकासाचे साधन नसून ते समाजाला प्रतिनिधीत्व देणारे साधन आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाबाबत अनेक आक्षेप आहेत. प्रतिनिधित्व मिळाले नाही तर माणूस कोणत्याही स्तराला जाईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण करणारा हा आदेश आल्याचे आंबेडकरांनी सांगितले.
संविधानामार्फत कन्वहरजन्स हा मुद्दा आणला आहे. त्यामार्फत आपला देश स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. परंतु, एकोपा आणण्याऐवजी विभक्तपणा आणला जात आहे. सर्वोच्च न्यायालय नेहमी गुणवत्तेच्या मुद्दावर निकाल देते. मात्र, याठिकाणी विकासाचा दुसरा मार्ग आरक्षण होऊ शकत नाही. आरक्षणाचा मुद्दा हा विकासाचा मुद्दा आहे, प्रतिनिधीत्वचा मुद्दा याबाबत अंतिम निकाल सर्वाच्च न्यायालयाने दिला असून आरक्षण हा विकासाचा मुद्दा धरण्यात आला, ही बाब चूक आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे का ? याबाबत विचारलं असता आंबेडकर म्हणाले, 'एससी, एसटी, ओबीसी वर्गाला व्यवस्थेविरोधात घालवण्याचा प्रयत्न काही पक्ष जाणीव पूर्वक करत आहेत. ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावे, ही मागणी केली आहे. त्यास आमचा विरोध आहे.
सरकारने जे 55 लाख मराठयांना ओबीसी प्रमाणपत्र वाटप केले आहेत ते रद्द करण्यात यावेत. जो कोणी ओबीसी आहे. त्यांनी कागदपत्रे दाखल केल्यावर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावे, परंतु शासन जे प्रमाणपत्र वाटप करते, त्याला आमचा विरोध कायम राहणार आल्याचे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.