Sharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणी मोठी अपडेट; 'या' धडाकेबाज अधिकाऱ्याकडे तपासाची जबाबदारी

Pune Police News : पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा भागात शुक्रवारी (ता. 5) दुपारी गुंड शरद मोहोळ याची निर्घृण हत्या करण्यात आली.
sharad mohol
sharad moholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आठ आरोपींना जेरबंद केलं. त्यानंतर ही हत्या 10 वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातून केली असल्याचा खुलासा आरोपींनी केला असला तरी पोलिस मात्र या प्रकरणाच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांकडून या हत्याप्रकरणाची पाळंमुळं खणून काढण्यात येत आहेत. यामध्ये दररोज नवीन वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होत आहे.आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा भागात शुक्रवारी (ता. 5) दुपारी गुंड शरद मोहोळ याची निर्घृण हत्या करण्यात आली. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर मोहोळला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे (Pune) पोलिसांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि आठ आरोपींना ताब्यातही घेतलं आहे.आता या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे देण्यात आला आहे.

sharad mohol
Eknath Shinde News : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमात महिलांचेच हाल; तीन तास उशीर, पाण्यासाठी धावाधाव

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. मोहोळ खून प्रकरणात आणखी कितीजण सहभागी आहेत, तसेच मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येणार आहे.पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांनी मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश मंगळवारी दिले

प्राथमिक तपासात मोहोळचा खून आर्थिक, तसेच जमीन व्यवहारातील वादातून झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्य सूत्रधार आरोपी पोळेकर याचा नामदेव कानगुडे याचा मामा आहे. नामदेवचा मोहोळने अपमान केला होता. अपमानाचा बदला घेण्यासाठी पोळेकरने खून केला. पोळेकरला पिस्तूल खरेदीसाठी आर्थिक मदत कोणी केली, तसेच मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जमिनीच्या वादातून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी शरद मोहोळचा(Sharad Mohol) खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांना अटक करण्यात आली आहे. कोथरुड पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

sharad mohol
Pune Politics : स्मार्ट सिटी गुंडाळली, आठ वर्षानंतर प्रकल्प बंद; महापालिकेकडे होणार हस्तांतरित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com