Pune BJP : भाजपचे 100 नगरसेवक रडारवर, रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमाला दांडी भोवणार! बिडकरांनी घेतली हजेरी

Ganesh Bidkar Ravindra Chavan : पुण्यात तब्बल 126 भाजप नगरसेवक आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला 100 नगरसेवकांनी दांडी मारल्याचे समोर आले.
Pune BJP leader Ganesh Bidkar during the party meeting where over 100 corporators remained absent in the presence of BJP State President Ravindra Chavan.
Pune BJP leader Ganesh Bidkar during the party meeting where over 100 corporators remained absent in the presence of BJP State President Ravindra Chavan.sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. मात्र, महापालिकेतील भाजपच्या १२६ नगरसेवकांपैकी 100 हून अधिक नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमालाच नगरसेवकांची दांडी असल्याने पक्षातील शिस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सभागृहनेते गणेश बिडकर यांनी गैरहजेरीची गंभीर दखल घेत उपस्थित नगरसेवकांची नोंद घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेतील चार वर्षांच्या प्रशासक राजानंतर झालेल्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपचे ११९ नगरसेवक निवडून दिले होते. त्यानंतर ७ स्वीकृत नगरसेवक मिळून भाजपची ही संख्या १२६ वर पोहोचली आहे. भाजप हा शिस्तीचा आणि शिपायासारख्या शिस्तीचे पालन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाच्या आदेशाचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक असते, मग ती बैठक असो, आंदोलन असो किंवा एखादा महत्त्वाचा कार्यक्रम.

Pune BJP leader Ganesh Bidkar during the party meeting where over 100 corporators remained absent in the presence of BJP State President Ravindra Chavan.
BJP Politics : हल्ल्यानंतर महापौरांनी केली महापालिका प्रशासनाच्या वसुलीचे वस्त्रहरण! म्हणाल्या,...

असे असतानाही, पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे व डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि महापौर मंजुषा नागपुरे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, एवढ्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीतही भाजपच्या शंभरहून अधिक नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे .त्यामुळे पक्षीय यंत्रणेतील अंतर्गत सुस्तावलेपण चव्हाट्यावर आली आहे.

सभागृहनेत्यांची कडक भूमिका

काही नगरसेवक कार्यक्रमाला आले खरे, पण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच तिथून काढता पाय घेतला. हा प्रकार लक्षात येताच सभागृहनेते गणेश बिडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी एका नगरसेविकेला उपस्थित नगरसेवकांची नावे नोंदवण्याची सूचना दिली आणि त्या नगरसेविकेने स्वतः सभागृहात फिरून कोण-कोण उपस्थित आहे, याची खातरजमा केली असे बोले जात आहे. आता या अनुपस्थित नगरसेवकांवर पक्षीय पातळीवर काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण पुण्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

Pune BJP leader Ganesh Bidkar during the party meeting where over 100 corporators remained absent in the presence of BJP State President Ravindra Chavan.
BJP Rajya Sabha seats : संसदेत पुन्हा वाढली भाजपची ताकद, राज्यसभेत मिळाले 9 खासदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com