BJP Adhiveshan : 5 हजार कार्यकर्त्यांना भाजपने वाटलेल्या ‘या’ किटमध्ये आहे तरी काय ?

BJP Distribution of five thousand kit party worker: पुण्यातील भाजपच्या अधिवेशनस्थळी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हातात असलेले हे कीट लक्ष वेधून घेत होते. या किटमध्ये नेमके काय आहे, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना होती.
 BJP kit
BJP kitsarkarnama
Published on
Updated on

BJP Adhiveshan : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील बालेवाडी येथे एक दिवशीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला राज्यातील मंत्र्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. राज्यभरातून तब्बल पाच हजार पदाधिकारी, कार्यकर्ते या अधिवेशानासाठी उपस्थित आहे. या कार्यकर्त्यांना भाजपकडून खास किटचे वाटप करण्यात आले.

अधिवेशनस्थळी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हातात असलेले हे किट लक्ष वेधून घेत होते. या कीटमध्ये नेमके काय आहे, याची उत्सुकता देखील कार्यकर्त्यांना होती.

लोकसभेतील अपयशानंतर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह Amit Shaha, नितीन गडकरी या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी कार्यकर्त्यांचा विश्वास वाढणार आहे.

 BJP kit
Pune BJP Convention : 'देवाभाऊ म्हणजेच महाराष्ट्राचा विकास'; पुण्याच्या अधिवेशनात दिसली भाजपच्या विधानसभा प्रचाराची झलक

किटमध्ये आहे काय?

कार्यकर्त्यांना अधिवेशनस्थळी वाटप करण्यात आलेल्या कीटमध्ये भगव्या रंगाची 'भाजप'चे BJP नाव लिहिलेली टोपी, गमछा, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक पुस्तक आणि भाकरवडीचा डब्बा आहे.

पोस्टरमधून पुन्हा 'देवाभाऊ'

अधिवेशनाच्या ठिकाणी तसेच शहरात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आलेल्या 'लाडकी बहीण'चा प्रचार जोरदार करण्यात आला आहे. तसेच ‘देवाभाऊ म्हणजे महाराष्ट्राचा विकास’ अशा आशयाचे पोस्टर लावून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना प्रोजक्ट करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांच्यासाठीच्याही योजनांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

 BJP kit
Ranjitsinh Mohite-Patil : लोकसभेपासून गायब झालेले रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या मंचावर अवतरले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com