Ranjitsinh Mohite-Patil : लोकसभेपासून गायब झालेले रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या मंचावर अवतरले

BJP Ranjitsinh Mohite Patil In Pune : निवडणूक काळात आणि निवडणुकीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या मंचावर आल्याचं पाहायला मिळालं नाही. अखेर आता पुण्यातील भाजपच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हजेरी लावली आहे.
Ranjitsinh Mohite Patil
Ranjitsinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 21 July : माढा लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील कुटुंब नाराज झाले. थेट शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा लढवली आणि ते विजयी देखील झाले.

निवडणूक काळात आणि निवडणुकीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या मंचावर आल्याचं पाहायला मिळालं नाही. अखेर आता पुण्यातील भाजपच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हजेरी लावली आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे भाजपचे विधानपरिषद आमदार असताना देखील मोहिते पाटील यांनी बंडखोरी केली. ज्याचा भाजपला मोठा फटका बसला. मोहिते पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे.

Ranjitsinh Mohite Patil
Video Ajit Pawar : "मी अजित आशा-अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून..."; दादांचा वाढदिवस, कार्यकर्त्यांनी बनवला शपथविधी सोहळा!

लोकसभा निवडणुकीदरम्यान व नंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या स्टेजवर जाणे टाळले होते. मात्र, आज पुण्यामध्ये आयोजित भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Ranjitsinh Mohite Patil
Shankar Jagtap: भाजपच्या शंकरशेठचं 'डेअरिंग' वाढलं: आमदार वहिनींना 'चॅलेंज', बॅनरवर 'राजकारण' केलं...

रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र तर नुकतेच लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झालेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांचे चुलत भाऊ आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये जी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली ती राजकीय समीकरण विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहतील, अशी शक्यता कमीच असल्याचं चित्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com