Pune Lok Sabha Politics : पुण्यात भाजपला मनसेची रसद मिळणार; काय आहे गणित ?

BJP-MNS : न्यायालयानेही ताशेरे ओढल्यानंतरही भाजपने निवडणूक झाली नसल्याने पुण्यात भाजपने महाविकास आघाडीचा धसका घेतल्याची चर्चा
MNS, BJP
MNS, BJPSarkarnama

Pune Political News : कसबा पोटनिवडणुकीत आमदार रवींद्र धगेंकरांनी भाजपला धूळ चारली. त्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या कसबा पॅटर्नचा प्रभाव वर्षभरानंतरही कायम आहे. पुण्यात याचा धसका भाजपने घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातूनच विजयासाठी भाजप मनसेची मदत घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत भाजपच्या जोडीला मनसे येण्याची शक्यता आहे.

पुण्यात मनसेने भाजप रसद द्यायची, त्या बदल्यात भाजप मनसेचे बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईत रसद देऊन मनसेचा पहिला खासदार लोकसभेत पाठवायचा, अशी डील झाली आहे. त्यासाठी भाजप आणि मनसेत उच्चस्तरावर खलबते सुरू असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

MNS, BJP
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री शिंदेंच्या खास शिलेदाराचं आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज, म्हणाले...

आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या त्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे रवींद्र धंगेकरांचा मोठा विजयी झाला. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव राज्यासह केंद्रीय नेतृत्वाच्याही जिव्हारी लागला. दरम्यान, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले.

नियमानुसार पुण्याची पोट निवडणूक होणे अपेक्षित होते. या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. मात्र निवडणूक आयोगानेच भाजपाच्या दबावापुढे नांगी टाकल्याची टीका होत आहे. परिणामी भाजपने पुण्यात महाविकास आघाडीचा चांगलाच धसका घेतला की काय, अशी चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MNS, BJP
Modi's Yavatmal Tour : शेतकरी विधवा, महिला पंतप्रधानांना जाब विचारणार

पुणे (Pune) लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपने ब्राम्हण समाजाला डावलल्याची भावना होती. रासनेंच्या उमेदवारीमुळे हक्काचा ब्राह्मण समाजाचा मतदार भाजपापासून दुरावल्याची बोलले जात होते. ब्राह्मण समाजाची ही नाराजी दूर करण्यासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णींना (Mugdha Kulkarni) राज्यसभेवर संधी दिली. असे असले तरी स्थानिक भाजप पदाधिकारी आणि मेधा कुलकर्णी यांच्याशी जुळवून घेताना दिसत नाहीत.

पुण्यातील अंतर्गत वादामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीतील धोका टाळण्यासाठी समविचारी पक्षाची गरज होती. यातूनच भाजप मनसेला साद घातली आहे. पुणे शहरात मनसेच्या मतदारांची संख्या एक लाखावर आहे. हे एकगठ्ठा मतदान भाजपला मिळाले तर सहज विजयी होईल, असे गणित भाजपचे आहे. तर पुण्याच्या बदल्यात मनसेचे चाणक्य आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निकटवर्तीय बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना दक्षिण मुंबईतून भाजप मदत करणार आहे. यामुळे नांदगांवकरांचाही लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

कल्याणमध्ये मनसेची भूमिका काय ?

कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) भाजप आणि मनसेकडून आव्हान दिले जात आहे. तसेच शिंदेंची कोंडी करण्यासाठी ठाकरे गटानेही रणनीती आखली आहे. परिणामी मुख्यमंत्री शिंदेंसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे. आपली जागा राखण्यासाठी शिंदे गटही जोखीम घेऊ इच्छित नाही. कल्याणची लढत सोपी करण्यासाठी श्रीकांत शिंदेच्यामागे मनसे आमदार राजू पाटील आपली ताकद उभी करणार असल्याची माहिती आहे.

(Edited by Sunil Dhumal)

MNS, BJP
Loksabha Election 2024 : परभणीत महायुतीचे कमळ कुणाच्या हाती? भाजपकडून निवडणुकीची 'फूलटू' तयारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com