SambhajiRaje Chhatrapati
SambhajiRaje ChhatrapatiSarkarnama

Sambhajiraje Chhatrapati : "अरे ही तर मोगलाई..."; संभाजीराजे का भडकले?

SambhajiRaje Chhatrapati On Mahayuti Government : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून भाजप आणि संभाजीराजे छत्रपती आमने-सामने आल्याचं पहिला मिळत आहे. स्मारकाच्या मुद्द्यावरून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला भाजपकडून आडकाठी होत असल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला आहे.
Published on

Pune News, 05 Oct : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून भाजप आणि संभाजीराजे छत्रपती आमने-सामने आल्याचं पहिला मिळत आहे. स्मारकाच्या मुद्द्यावरून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला भाजपकडून आडकाठी होत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपतींनी केला आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे म्हणाले, "2016 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले. त्याचा मोठा गाजावाजा भाजपकडून करण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च करून हाती घेण्यात आलेलं स्मारकाचे काम कुठपर्यंत आलं ते पाहण्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत.

त्यामुळे त्याबाबतचे पोस्टर आम्ही मुंबईत लावले होते, ते काढून फाडून टाकण्यात आले. जो व्यावसायिक हे पोस्टर प्रिंट करत होता. त्याला देखील धमकवण्यात आले. तसेच आम्ही ज्या बोटी बुक केल्या त्यांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ही राज्य सरकारची केवळ दडपशाहीच नाही मुघलशाही आहे. हे भाजपकडून हे केले जात आहे.

आमचे पोस्टर लावत असलेल्या कामगारांना खेरवाडीच्या गुरव नावाच्या पोलिस निरीक्षकाने पोलिस स्टेशनमध्ये मारहाण केली. स्वतःची चूक झाकायची आणि आणि आम्हाला तिथे जाऊ द्यायचं नाही, असा भाजपचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला.

SambhajiRaje Chhatrapati
Ajit Pawar : सुनील टिंगरेंची उमेदवारी कापणार? अजितदादांनी सांगितले, 'जाणीवपूर्वक ...'

मात्र, आम्हाला कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तिथे जाणार. आम्ही आमचा अधिकार म्हणून तिथे जाणार आहोत. आज पर्यावरण तसेच इतर कारणांमुळे स्मारकाचे काम होत नसल्याचे सांगण्यात येतं आहे. मग याचा आधी का विचार केला नाही. पंतप्रधानांनी जलपूजन केलं. ते काय फक्त निवडणूक होती म्हणून का? असा सवाल संभाजीराजेंनी सरकारला केला.

तर आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. संभाजीराजे म्हणाले, "आम्ही पाहणी कऱण्यासाठी बोटीने जाणार आहोत. मात्र, त्याआधीच आमच्या कार्यकर्त्यांना घेतल तर परवानगी रद्द करू, अस बोटीच्या मालकांना धमकावलं जात आहे. ही मोघलशाही सुरु आहे. आम्ही सगळं नियमानुसार करत आहोत. भाजपची ही दडपशाही सुरू आहे.

SambhajiRaje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati : 'शरद पवारांना टिंगल करण्याचा अधिकार पण...', संभाजीराजेंच जोरदार प्रत्युत्तर

इतिहासात मोघलशाही सुरु होती, मात्र आता भाजपाकडूनदेखील मोघलशाही सुरु आहे. आम्ही नियमात सगळं करत आहोत. ⁠आम्ही कायदेशीर मार्गाने जाणार आहोत. जर यांनी आम्हाला अडवले तर त्याला पूर्णपणे ते जबाबदार असणार आहेत. 100 बोटी बुक केल्या होत्या, मात्र 50 बोटी घेऊन जाणार आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानादेखील यावर आवाज उठवला होता.

आमच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना धमकावलं जात आहे. पोलिसदेखील यात सहभागी आहेत. संविधानाने जो अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही जाणार आहोत. शिवस्मारक उभारलं जावं, अशी सगळ्यांची ईच्छा आहे. ⁠स्मारकाची जागा बदलली या सर्व गोष्टींचा रिपोर्ट द्यायला हवा. महायुती आणि महाविकास आघाडी अस्वस्थ आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होणार असल्याचंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com