Pune Political News : इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून भाजपने कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. हाच धागा पकडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील बॉण्ड भ्रष्टाचारावरून सरकारला कोंडीत पकडण्यात येत आहे.
इमानदारीचा खोटा आव आणणाऱ्या मोदी सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा या बॉण्ड भ्रष्टाचाराने फाटला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप(Prashant Jagtap) म्हणाले, कॉर्पोरेट कंपन्यांकडून खंडणी वसूल करण्यासाठी तसेच सरकारी कंत्राट देण्यासाठी, राजकीय देणगीच्या स्वरूपात लाच घेण्यासाठी या इलेक्टोरल बॉण्ड्सचा कसा वापर करण्यात आला आहे.
राजकीय देणगी देणाऱ्या अनेक कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू होती. कोणत्या कंपनीवर कधी कारवाई झाली आणि या कारवाईतून मुक्त होण्यासाठी या कंपन्यांनी कशी देणगी दिली याची इत्यंभूत माहिती यावेळी समोर आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजकीय देणगी देणाऱ्या एका कंपनीला बिहारमधील एका पुलाचे कंत्राट देण्यात आले होते, त्या कंपनीने बांधलेला पुल काही दिवसांतच जमीनदोस्त झाला, यात मोठी मनुष्यहानी झाली. तरीही इलेक्टोरल बॉण्ड्स दिल्यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात आलेली नाही.
जुगाराच्या माध्यमातून देशातील कित्येक कुटुंबे उध्वस्त करणाऱ्या गेमिंग कंपनीकडून देणगी स्वीकारताना सरकारची साधनसुचिता कुठे गेली? कोविडच्या काळात गरीब रुग्णांना लुबाडण्याचा आरोप असलेल्या हॉस्पिटलकडून देणगी स्वीकारताना नैतिकता कुठे गेली ? असा संतप्त सवाल प्रशांत जगताप यांनी केला.
अनेक कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचे सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून लाच दिली असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
जगताप पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने(BJP) इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून अमाप माया जमवली आहे. याच पैशाच्या जोरावर ते इतर पक्षांमध्ये फूट पाडून, त्यांचे आमदार, खासदार विकत घेऊन लोकशाहीला एकप्रकारे पैशाच्या जोरावर जमीनदोस्त करण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.