Rahul Gandhi Vs Narendra Modi : एक अकेला राहुल गांधी मोदी-शहांवर भारी, ठाकरे गटानं डिवचलं

Shivsena On Narendra Modi : मोदी यांचे नकली हिंदुत्वाचे नाणे अजिबात चालले नाही व सोमवारी संसदेत राहुल गांधी यांनी मोदी-शहांना नामोहरम केले, असंही ठाकरे गटानं म्हटलं आहे.
amit shah narendra modi rahul gandhi
amit shah narendra modi rahul gandhisarkarnama
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, रविशंकर प्रसाद, भूपेंद्र यादव हे एका बाजूला व दुसऱ्या बाजूला ‘एक अकेला’ राहुल गांधी या सगळ्यांवर भारी पडले. मोदी–शहांचा अहंकार संसदेत चूर करण्याचे काम गांधी यांनी केले, असं म्हणत शिवसेनेनं ( ठाकरे गट ) राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेचं 'सामना'तून कौतुक केलं आहे.

"ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करून संपूर्ण विरोधी पक्षाला मोदी–शहा घाबरवत राहिले. आता विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना रोखा, त्यांच्यापासून संरक्षण द्या, अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ या अहंकाऱ्यांवर आली. काळाने घेतलेला हा सूड आहे. मोदी–शहांना यापेक्षा वाईट दिवस भविष्यात पाहावे लागणार आहेत," असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

"भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा आणि हिंदूंचा ठेका घेतलेला नाही, असा जोरदार हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. भर संसदेत मोदी, शहा व त्यांच्या भाजपचा मुखवटा गांधी यांनी ओरबाडून काढला व एकच गोंधळ झाला. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागण्याची वेळ अमित शहांवर ( Amit Shah ) आली," असा टोला ठाकरे गटानं लगावला आहे.

amit shah narendra modi rahul gandhi
Rahul Gandhi Letter to PM Modi : लोकसभेतील प्रचंड गदारोळानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले...

"राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी सांगितले, 'हे लोक हिंदुत्वाच्या नावावर दंगली घडवत आहेत. मत्सर, द्वेष पसरवत आहेत. खरे हिंदुत्व संयमी आणि सत्याची कास निर्भयपणे धरणारे आहे.' यावर पंतप्रधान मोदी हे तगमगत उठले व गांधी हे हिंदू समाजाचा अपमान करीत असल्याचे बोलले. यावर गांधी यांनी ताडकन उत्तर दिले, 'महाशय, तुम्हाला हिंदुत्व कळलेच नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.' यावर मोदी यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मोदी-शहांच्या मैदानात शिरून त्यांना अशा पद्धतीने कोणीच सुनावले नव्हते. दहशत व पाशवी बहुमताच्या बळावर या जोडगोळीने संसद आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न केला, पण गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष लोकसभेत अवतरताच हिंदुत्वाच्या नावावर मनमानी करणाऱ्यांचा टांगा पलटी झाला आहे," अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.

amit shah narendra modi rahul gandhi
PM Narendra Modi : बालकबुध्दी... तुम से नही हो पायेगा! मोदींकडून राहुल गांधींवर कारवाईचे संकेत

"मोदी यांचे हिंदुत्व हे नफरत आणि हिंसा फैलावणारे आहे. हिंदू-मुसलमानांत भांडणे लावणारे आहे, पण पंतप्रधान मोदी एकदाही हिंसाचारग्रस्त मणिपुरात गेले नाहीत. भाजप भय आणि द्वेषाचे विष पसरवतो. हा राष्ट्रवाद नाही आणि हिंदुत्व तर नाहीच. हिंदुत्व हे संस्कारी आणि सुसंस्कृत आहे. हा संस्कार भाजपमध्ये नाही. मोदी यांना निवडणूक प्रचारात ‘मुजरा’ आठवला. मुसलमान तुमच्या बायकांच्या गळ्यातील मंगळसूत्रे खेचतील. तुमच्याच दारात दोन म्हशी असतील तर एक म्हैस घेऊन जातील, अशी उटपटांग भाषणे करूनही मोदी यांना हिंदूंची मते मिळाली नाहीत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत त्यांचा सपशेल पराभव झाला. मोदी यांचे नकली हिंदुत्वाचे नाणे अजिबात चालले नाही व सोमवारी संसदेत राहुल गांधी यांनी मोदी-शहांना नामोहरम केले," असंही ठाकरे गटानं म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com