राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर बिल फाटणार होते... तो वेळीच सावध झाला आणि भाजपचा नेता अडकला!

भाजपला (BJP) साडेचार महिन्यांतच दुसरा जोर का धक्का बसला आहे.
BJP-Ncp
BJP-Ncpsarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर केशव घोळवेंसह (Keshav Gholave) पाचजणांना पिंपरी पोलिसांनी बुधवारी (ता.२) अटक केली. त्यांना ५ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश पिंपरी न्यायालयाने दुपारी दिला. यामुळे भाजपला (BJP) साडेचार महिन्यांतच दुसरा जोर का धक्का बसला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयासमोरच उभ्या राहिलेल्या मेट्रोच्या पिंपरी स्टेशनमुळे विस्थापित होणाऱ्या तेथील तयार कपड्यांच्या शंभर गाळेधारकांना पालिकेकडून ते मिळवून देतो, असे सांगत घोळवे व अटक केलेल्या गाळेधारकांच्या गजानन व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांसह चौघांनी या गाळेधारकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. दरम्यान, आपल्या कामगार नेते नगरसेवकाला अटक झाल्याचे समजताच महापौर माई ढोरे व सभागृहनेते नामदेव ढाके यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि असंख्य कामगारांनी पोलिस ठाण्यावर धाव घेऊन तेथे मोठी गर्दी केली होती.

BJP-Ncp
राष्ट्रवादीने कोंडी करताच भाजप नेत्यांनी दिला हा इशारा..

दरम्यान, भाजप प्रदेश कामगार आघाडीच्या नावे ही हफ्तेवसुली तथा फसवणूक झाल्याने भाजपची दुहेरी अडचण झाली आहे. त्यांच्या नगरसेवकाला, तर अटक झालीच. शिवाय पक्ष संघटनेचीही त्यातून बदनामी झाली आहे. त्याचा फटका आगामी पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याने घोळवेंविरुद्ध पक्ष कारवाई करतो की कसे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, ती होण्याची शक्यता कमी आहे. कारण घोळवे हे पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच ते जुने व कट्टर भाजपाई आहेत. दुसरीकडे, लाचखोरीच्या गुन्ह्यात गेल्यावर्षी अटक झालेले भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्याविरुद्ध कसलीही कारवाई पक्षाने अद्यापपर्यंत केलेली नाही.

दुसरीकडे हे राजकीय षडयंत्र असून भाजपला बदनाम करण्याचा डाव असल्याचे ढाके यांनी सांगितले. उलट या खंडणी व फसवणुकीच्या गुन्ह्यातील फिर्यादीनेच या गाळेधारकांकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच्याविरुद्ध कारवाई केली नाही, तर पोलिस ठाण्यासमोर धरणे धरू, असा इशारा त्यांनी दिला आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाच्या दबावाला पोलिस बळी पडल्याचा दावा त्यांनी केला. या गाळेधारकांना घोळवे यांनीच न्याय मिळवून दिलेला आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नगरसेवक व माजी उपमहापौर डब्बू ऊर्फ हिरानंद आसवानी हे या गाळेधारकाकंडून पैसे उकळत असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे काही गाळेधारक थेट आसवानी यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार समजला. त्याचा त्यांना धक्का बसला. त्यामुळे तातडीने त्यांनी त्याबाबत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यात त्यांनी या गाळेधारकांच्या गजानन व्यापारी संघटनेचा अध्यक्ष गुड्डू यादव याने ६० ते ७० लाख रुपये या गाळेधारकांकडून उकळल्याचे नमूद केले होते. त्याच्या तपासात नगरसेवक घोळवेंना अटक झाली.

गेल्यावर्षी १८ ऑगस्टला पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यासह स्थायीच्या चार कर्मचाऱ्यांना पालिकेच्या एका ठेकेदाराकडून एक लाख १८ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यावेळीही हे राजकीय कटकारस्थान असून त्यात अॅड लांडगे यांना गोवल्याचा आरोप भाजपने केला होता. त्या गुन्ह्यापेक्षा हा गुन्हा गंभीर असल्याने घोळवेंना लांडगेपेक्षा अधिक काळ कोठडी तथा तुरुंगात राहावे लागण्याची शक्यता आहे.

BJP-Ncp
शहराध्यक्षांच्या मतदारसंघातच भाजपचे नाक कापण्याची राष्ट्रवादीची फिल्डींग

हे तथाकथित हफ्तेवसुलीचे प्रकरण जुने म्हणजे २०११९ चे आहे. पालिका मुख्यालयाजवळील तयार कपड्यांच्या नेपाळी मार्केटमध्ये ही हप्ता वसुली तथा फसवणूक झाल्याचे फिर्यादी तय्यब अली शेख (वय ४५, रा. पिंपरी, मूळ रा. उत्तरप्रदेश) यांचे म्हणणे आहे. त्यात घोळवे वगळता अटक झालेले इतर चौघे हे नेपाळी मार्केटमधील गाळेधारकांच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत. ते सर्व मूळचे यूपीचेच आहेत. त्यात गुड्डू ऊर्फ प्रमोद यादव, मलका यादव, घनश्याम यादव आणि हसरत अली शेख अशी त्यांची नावे आहेत.

मेट्रो कामात नेपाळी मार्केटची जागा जात असल्याने सरकार त्यांना दुसरीकडे गाळे देणार होते. तरीही आपण पालिकेकडून गाळे मिळवून देतो असे सांगत आरोपींनी या प्रत्येक गाळेधारकांकडून वर्षाला बाराशे रुपयांची पावती भाजपच्या कामगार आघाडीच्या नावे फाडल्याची तक्रार आहे. तसेच त्यांनी फिर्यादीला गाळा मिळवून देण्यासाठी त्याच्याकडून ५५ हजार रुपये घेतले. त्यानंतरही त्यांनी एक लाख रुपये मागितले अन्यथा जीवे ठार मारू अशी धमकी दिली होती, असा आरोप करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com