Sushma Andhare News : सुषमा अंधारेंचा मतदारसंघ ठरला ! 'या' जागेवरून विधानसभा निवडणूक लढणार?

Political News : महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचे सूत्र निश्चित झालेले नाही. त्यामुळे कुठली जागा कोणाच्या वाट्याला येणार याबाबत सांशकता आहे.
Sushma Andhare Banar
Sushma Andhare Banar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवसेना ठाकरे गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती आखण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ठाकरे सेना आपले सर्व महत्वपूर्ण मोहरे या विधानसभेच्या आखाड्यात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे देखील आगामी विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत. त्या पुणे शहरातील एक विधानसभा मतदारसंघ निवडणार असल्याचा देखील चर्चा सध्या सुरू आहेत.

आगामी विधानसभा निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्ष एकत्रितरित्या लढणार आहेत. त्यामुळे सध्या जागा वाटपाबाबत आघाडी- युतीमध्ये खलबत्त सुरू आहेत. हा जागा वाटपाचा तिढा लवकरच सोडवू असे जरी सांगण्यात येत असले तरी अद्याप महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचे सूत्र निश्चित झालेले नाही. त्यामुळे कुठली जागा कोणाच्या वाट्याला येणार याबाबत सांशकता आहे.

अशातच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तर काँग्रेसने देखील चार विधानसभा मतदारसंघावर आपला हक्क सांगितला आहे. कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार हे अंतिम चित्र जागा वाटपनंतरच समोर येईल.

दरम्यान वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे सुनील टिंगरे (Sunil Tingre) हे आमदार आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला सुटेल असे मानले जात आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. आता पक्षाकडून दावा केल्यानंतर या जागेवरचे दावेदार ही समोर यायला लागले आहेत.

Sushma Andhare Banar
NCP Sharad Pawar : तुतारी वाजवायची इच्छा; पक्षाच्या तिजोरीत टाका 10 हजारांचा निधी

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला सोडावा, अशी मागणी करत थेट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाच या विधानसभा मतदारसंघातून उतरवण्याची तयारी स्थानिक शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

सध्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टवर सुषमा अंधारे यांचा मोठा फोटो वापरत 'उच्चशिक्षित, निर्भीड, कणखर व्यक्तिमत्व वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय” असे मजकूर लिहण्यात आला आहे. या मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना विजय अत्यंत सोपा असून सध्याची गणित पाहिल्यास या मतदारसंघांमध्ये तब्बल 70 हजारापर्यंत शिवसेना ठाकरे गटाचा मतदार असून या ठिकाणच्या पोर्श कार अपघात प्रकरणांमध्ये सुषमा अंधारे यांनी घेतलेल्या भूमिकेचा देखील फायदा त्यांना होऊ शकतो असे स्थानिक नेत्यांचे मत आहे.

Sushma Andhare Banar
Ajit Pawar NCP : अजितदादांचं विधानसभेचं जागावाटप ठरलं! 54 फिक्स तर टार्गेट 'इतक्या' जागांचं

त्यामुळे या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सुषमा अंधारे यांना निवडणूक लढण्याची गळ घालण्यात येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारे या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढताना पाहायला मिळू शकतात, असे बोलले जात आहे.

सुषमा अंधारे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाल्या, 'मी पक्षातील सर्व आदेशांचे पालन करणारी आणि संघटनबांधणीला प्राधान्य देत काम करणारी एक शिस्तप्रिय शिवसैनिक आहे. विधानसभा निवडणूकीत माझ्यावर काय जबाबदारी असेल ती अजून निश्चित झालेली नाही. सन्माननीय पक्षप्रमुख जी जबाबदारी देतील ती जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे.'

लोकसभेत किंवा विधानसभेत माझी उमेदवारी असावी, यासाठी शिवसैनिक भावंडाकडून जी मागणी होते. त्यांच्या भावनांचा मी मनापासून आदर करते. परंतु, या संबंधाने निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार सन्मानानिय पक्षप्रमुखांना आहे आणि तो अबाधित राहावा, अशी माझी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

Sushma Andhare Banar
Ajit Pawar News : दादांनी दिला बहिणींना पाच वर्षांचा वादा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com