
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे सध्या 'मोदी @9' हे महाजनसंपर्क अभियान देशभर सुरु आहे. त्याअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबापर्यंत पोहचून पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज बोलून दाखवला.
'मोदी @9' मोहिमेत याअगोदर पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी अनुक्रमे 63 हजार आणि साठ हजार घरांत जाऊन केंद्र सरकार तथा मोदींनी गेल्या नऊ वर्षात केलेली विकासकामे सांगण्यास सुरवात केली आहे. तर आता राज्यातील दुसऱ्या क्रमाकांच्या मोठ्या चिंचवड मतदारसंघातील भाजप पदाधिकारी एक लाख कुटुंबात जाऊन केंद्र सरकारच्या कामगिरीचे पत्रक देणार आहेत.
त्यातून पिंपरी महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व पक्षाच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी 'मोदी @9' मोहिमेच्या पत्रकारपरिषदेत आज (ता.27) बोलून दाखवला. या अभियानांतर्गत चिंचवड मतदारसंघामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. आगामी लोकसभेला मावळमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त करण्यासाठी सर्वांनी कामास लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पक्षाचे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकर जगताप, 'मोदी @9' चे चिंचवड विधानसभा संयोजक आणि शहर सरचिटणीस अॅड.मोरेश्वर शेडगे, पिंपरी महापालिकेतील माजी पक्षनेते नामदेव ढाके, महिला शहराध्यक्षा उज्वला गावडे, 'मोदी @9'चे संयोजक शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर आदी यावेळी उपस्थित होते.
मावळमधून भाजपने लढण्याची जोरदार तयारी सुरु केली असून पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी, तर हा मतदारसंघ पक्षाकडे घेण्याचा आग्रह धरला आहे. त्याविषयी विचारणा केली असता शिवसेनेकेडे (शिंदे गट) असलेल्या मावळबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं शंकर जगताप यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान,'मोदी @9'मध्ये आज पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व बूथ प्रमुखांशी व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून संपर्क केला. तर, उद्या चिंचवड विधानसभा क्षेत्रातील सर्व माजी नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी, मंडल पदाधिकारी यांची टिफिन पार्टी होणार आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.