Apoorva Hiray News: अपूर्व हिरे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा; स्वत:च दिली मोठी माहिती !

Nashik Politics: ठाकरे गटात प्रवेशाच्या चर्चांचा अपूर्व हिरे यांनी इन्कार केला.
Dr.Apoorva Hiray
Dr.Apoorva HiraySarkarnama
Published on
Updated on

Nashik News: गेल्या काही महिन्यांपूर्वीच अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीत असणारे अपूर्व हिरे हे देखील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, या चर्चा अपूर्व हिरे यांनी फेटाळून लावल्या आहेत. "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे", अशी प्रतिक्रिया देत अपूर्व हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेशाचा इन्कार केला आहे.

यावेळी अपूर्व हिरे म्हणाले, "मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व शरद पवार, अजित पवार यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही आणि जाऊही देणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही", असे स्पष्टीकरण अपूर्व हिरे यांनी दिले आहे.

Dr.Apoorva Hiray
Solapur DCC Bank : अकराशे कोटींच्या थकबाकीची जबाबदारी १८ संस्थांवर होणार निश्चित; मोहिते पाटलांपासून सोपलांपर्यंत बड्या नेत्यांचा समावेश

पक्षात काहीही अडचण नाही. पक्षात राहूनच महाविकास आघाडी युतीचा धर्म पाळणार असल्याची माहिती अपूर्व हिरे यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटात प्रवेशाच्या चर्चेंवर सध्या पडदा पडला आहे.

अपूर्व हिरे पुढे म्हणाले, "काही दिवसांपूर्वी मी (अपूर्व हिरे) व अद्वय हिरे यांच्या समवेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत धुळे लोकसभा मतदारसंघ, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ व नाशिक लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघमध्ये निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे कदाचित मी शिवसेनेत (ठाकरे गट) जाणार या चर्चेंना उधाण आलं असावं. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमवेत हिरे कुटुंबाची नाळ जोडली गेलेली असून हे बंध न तुटणारे आहे", असं ते म्हणाले.

Dr.Apoorva Hiray
Sunil Kendrekar Voluntary retirement News : स्वेच्छा निवृत्तीनंतर केंद्रेकर शेती, आध्यात्म अन् समाजसेवेला वाहून घेणार..

दरम्यान, आज महाविकास आघाडी एकत्रित येऊन काम करत आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मी शिवसेना (ठाकरे गट) पक्षासाठी देखील काम करतच असल्याचे हिरे यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. नाशिक पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढविताना चौकाचौकात मतदार बांधवांच्या भेटीगाठी करत पक्ष बांधणीकरिता प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासमोर चांगलीच लढत दिली होती, असंही त्यांनी सांगितलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com