Chandrakant Patil News : नऊ मे पूर्वी निकाल आला तर महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये; अन्यथा...

BJP : गेल्या काही महिन्यांपासून महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत आहेत.
Chandrakant Patil News
Chandrakant Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही महिन्यांपासून महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे या निवडणुका नेमकी कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ''महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. 9 मे नंतर न्यायालय उन्हाळी सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे 9 मे पूर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्‍टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्‍यता आहे,'' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil News
Sharad Pawar News : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंमध्ये तासाभरापासून खलबतं; EVM, जेपीसी, अदानी, आंबेडकरांच्या मुद्यावर चर्चा?

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका मागील एक वर्षांपासून रखडलेल्या आहेत. या संबंधित प्रकरण सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकारने अद्याप प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. त्यामुळे याबाबतचा निकाल आणखी काही दिवस पुढे ढकलला आहे.

दरम्यान, सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांबाबत प्रश्‍न विचारण्यात आले.

Chandrakant Patil News
Pankaja-Dhnanjay Munde News : भगवान गडावर मुंडे बहिण-भावाने केलेला संकल्प पुर्णत्वास जाणार का ?

यावेळी पाटील म्हणाले, ''स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. मात्र, हा सर्व न्यायालयाशी संबंधित विषय असल्यामुळे त्याबाबत काही बोलता येणार नाही. परंतु मे महिन्यात न्यायालय उन्हाळी सुट्टीवर असते. 9 मे नंतर न्यायालयास उन्हाळ्याची सुट्टी लागेल. त्यामुळे त्यापूर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्‍टोबरमध्ये निवडणुका लागू शकतात. कारण जुनपासून पावसाळा सुरु होतो'', असं ते म्हणाले.

दरम्यान,''मतदारसंघांच्या रचना, मतदार याद्या अद्ययावत करणे, अशी निवडणुकीच्या तयारीची कामे सुरु होतात. त्यामध्ये बराच कालावधी जातो. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात, असा माझा प्राथमिक अंदाज आहे'', असं ते म्हणाले.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com