शेलारांचा ठाकरेंना खोचक सल्ला, म्हणाले, 'मग घ्या ना धौती योग'

Ashish Shelar : शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत.
Uddhav Thackeray, Ashish Shelar
Uddhav Thackeray, Ashish Shelar sarkarnama
Published on
Updated on

पुणे : मुंबईत भाजपने (bjp)लालबाग परळमध्ये मराठी गाण्यांवरील आधारित मराठी दांडिया आयोजित केला आहे. त्यावरुन भाजप आणि शिवसेनेत (shivsena) वाद रंगला आहे. 'सामना'च्या अग्रलेखात आज यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. त्याला भाजपचे नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

"शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही अशा शब्दात शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

"कमळाबाईचा आता मराठी दांडिया" असं म्हणत भाजपला शिवसेनेनं डिवचलं आहे. जैन समाजानं मांसाहाराच्या जाहिरातीचा उठवलेल्या मुद्द्याला भाजप जबाबदार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. सामनाच्या टिकेवर आशिष शेलारांचे उत्तर दिले आहे.

Uddhav Thackeray, Ashish Shelar
भाजपच्या 'मराठी दांडिया' वरुन शिवसेनेचा टोमणा, मांसाहारावरुनही निशाणा

"ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली..ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत.

"ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला " मग घ्या ना धौती योग!"अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. शेलारांनी टि्वट केले आहे.

शेलार यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की..

भाजप दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करीत आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे "करुन दाखवले"असे होर्डिंग लावले नाहीत. पण जेव्हा आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता "थापा" पण राहिला नाही आणि उत्सवही ...यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली.

गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच!

अहंकार,गर्व हरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय, राजकीय वाद काढून क्लेश करुन तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत त्यांच्यासाठी अंबे माते तुझ्या चरणी एकच प्रार्थना....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com