Pune News : भाजप नेत्याला तुरुंगात पाठवणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याची बदली रद्द, अखेर न्याय मिळाला!

Police Officer Justice Pune BJP : वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकाची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली होती. या महिला अधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात केला होता.
Pune Police News
Pune Police NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : फरासखाना पोलिस ठाण्यातील वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग भाजपमधील प्रमोद कोंढरे या नेत्याने केला होता. महिला निरीक्षक या बंदोबस्तावर असताना जून महिन्यात ही घटना घडली होती. नेत्याच्या या कृत्यानंतर भाजपने त्याला पक्षातून निलंबित केले होते. पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती.

दरम्यान, या घटनेनंतर गणेशोत्सव आणि निवडणुकीत त्यांना अवमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागू नये व संबंधित व्यक्तीकडून त्रास होईल म्हणून विनंती बदली अर्ज द्या, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला. मात्र त्यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली

मात्र, याविरोधात त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची वाहतूक शाखेत केलेली बदली प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. बदली आदेश दंडात्मक स्वरूपाचा आणि सूडबुद्धीने काढल्याचे दिसून येते, असे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदवत हा निकाल दिला.

Pune Police News
Maratha Reservation Protest : "एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्याला दिल्यास..."; बावनकुळेंनी 'ती' भीती व्यक्त करत मराठा आरक्षणावरून काँग्रेसची केली कोंडी

21 जुलैला त्यांची अचानक बदली वाहतूक शाखेत करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या बदलीला आव्हान देत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. त्यांच्यावतीने वकील ए.एस. बायस यांनी युक्तिवाद केला, तर राज्य सरकार आणि पोलिस आयुक्तालयाच्या वतीने अधिकारी एस.पी. मंचेकर यांनी बाजू मांडली. प्राधिकरणाने आदेश देत ही बदली रद्द करत महिला पोलिस अधिकाऱ्याला दिलासा दिला.

१९ जुलै रोजी पोलिस उपायुक्तांनी महिला अधिकाऱ्याविरोधात पोलिस आयुक्तांकडे डिफॉल्ट अहवाल पाठविला. मात्र, त्या अहवालात २१ जुलैच्या घडामोडींचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे हा अहवाल आधीच्या तारखेला म्हणजे १९ जुलै दाखवून तयार करण्यात आला असल्याचे न्यायाधिकरणाच्या लक्षात आले. कोणतीही नोटीस न देता किंवा स्पष्टीकरण न मागता थेट बदली आदेश देणे हे नियमांच्या विरोधात आहे, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. तसेच, अर्जदार महिला अधिकाऱ्याला पुन्हा मूळ पदावर नेमण्याचे आदेश दिले.

Pune Police News
Ramdev Baba US tariff : रामदेव बाबा संतापले : अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार टाका, ट्रम्पला झुकवू!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com