Raosaheb Danve: लोकसभा पराभवानंतर दानवे यांचा मोठा निर्णय; लोकांनी मला थांबायला सांगितलं...

BJP Leader Raosaheb Danve Big Decision On Election: मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. पक्ष संघटनेत पक्षाने सांगितलं तर जबाबदारी घेऊ मात्र पक्ष संघटनेत नाही मात्र पक्षाचं काम करू असं दानवे यांनी स्पष्ट केलं.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Pune News : माजी केंद्रीय मंत्री, पाच वेळा सलग खासदार राहिलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एकीकडे पंकजा मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन भाजपने विधान परिषदेच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे दानवे यांचे देखील पुनर्वसन होणार का? याच्या चर्चा सुरू असतानाच दानवे यांनी ना विधान परिषद, ना विधानसभा,राज्यसभा कुठलीही निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.

रावसाहेब दानवे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधान परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचा झालेल्या विजयावर ते बोलत होते. भाजपकडे स्पष्टपणे बहुमत होतं. मात्र काँग्रेसच्या मनामध्ये आताही द्विधा मनस्थिती आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येता येईल की नाही अशी शंका काँग्रेसच्या अनेक आमदारांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे ते आतून बाहेरून संपर्कात महायुतीच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना असुरक्षित वाटत असल्यामुळे ज्या ठिकाणी सुरक्षित आहे. त्या ठिकाणी मतदान करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. भविष्यात काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया करेल का ? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्यास देखील दानवे म्हणाले.

Raosaheb Danve
Rajabhau Waje Politics: ठाकरे गटाच्या खासदाराकडून पंकजा मुंडे यांचं अभिनंदन, काय आहे कारण?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटंबाबत बोलताना दानवे म्हणाले, "मराठा आरक्षणाचा प्रश्न हा फक्त सरकारचा नाही. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित येऊन तोडगा काढण्याची गरज आहे.

या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून बैठक बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला विरोधकांना फक्त याचं राजकारण करायचं आहे. विरोधकांचा असं मत असेल की ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्या तर त्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे. मात्र ते फक्त पडद्यामागून राजकारण करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांचीच भूमिका असून फक्त याबाबत सर्वांनी एकत्रित येऊन तोडगा काढणे आवश्यक असल्याचे दानवे यांनी सांगितलं.

भविष्यातील राजकीय निर्णयाबाबत विचारलं असतात आणि म्हणाले, "लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी मला थांबायला सांगितलं आहे. त्यामुळे मी कोणत्याही संधीची वाट बघत नाही. जेव्हा पुन्हा लोक मला जा म्हणतील तेव्हाच मी जाईन मधल्या काळामध्ये मी कोणतीही संधी शोधत नाही. विधानसभा नाही, विधान परिषद नाही, राज्यसभा नाही ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही. पक्ष संघटनेत पक्षाने सांगितलं तर जबाबदारी घेऊ मात्र पक्ष संघटनेत नाही मात्र पक्षाचं काम करू असं दानवे यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com