
Pune News : पुण्याचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजप पदाधिकारी सुधीर आल्हाट यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर गुप्ता हे लाचलुचप्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहेत. माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta ) यांच्या पुण्यातील मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे.
भाजपचे पदाधिकारी सुधीर आल्हाट यांनी माजी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची खुली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे.
पुण्यातील अमेनोरा टाउनशिपमध्ये माजी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा आलिशान व्हिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.तसेच मुंबईतील सांताक्रुझ परिसरातही त्यांचा आलिशान प्लॅट असल्याचा गंभीर आरोप भाजप पदाधिकारी सुधीर आल्हाट यांनी यावेळी केले आहे. तसेच त्यांनी गुप्ता यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) आता अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची गुप्त चौकशी पूर्ण केली आहे. या चौकशीत काही प्रमाणात तथ्य आढळून आलं आहे.त्याचमुळे आता पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या एसीबीच्या महासंचालकांकडे या गुप्ता यांच्या मालमत्तेची खुली चौकशी करण्याची परवानगी मिळण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
काही महिन्यांपूर्वी अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची गुप्त चौकशी ही पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर आता याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुन्हा आता अॅक्शन मोडवर आला आहे. त्यामुळे गुप्ता यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिस आयुक्त पदावरुन 13 डिसेंबर 2022 रोजी गुप्ता यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा चार दिवसांनंतर त्यांची राज्याच्या गृह विभागाने पुन्हा बदली केली. गुप्ता हे महाराष्ट्र राज्याच्या तुरुंगांचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.पुण्यातील त्यांची शहर पोलिस आयुक्त म्हणून कारकीर्दही प्रचंड गाजली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.