Amitabh Gupta : बदल्यांचा घोळ संपेना; आठवड्यातच अमिताभ गुप्ता पुन्हा पुण्यात

Amitabh Gupta : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या
Amitabh Gupta
Amitabh Guptasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश होता. गुप्ता यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने दोन दिवसांत पुन्हा बदल्यांचे सुधारीत पत्र काढले आहे. त्यामध्ये राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदा ऐवजी आता अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे येथे करण्यात आली आहे.

Amitabh Gupta
Prakash Ambedkar News : आघाडीचा मोर्चा यशस्वी पण आंबेडकरांच्या भूमिकेमुळे ठाकरेंसमोर पेच

सुधारीत पत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोठे?

रंजन कुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma) यांची अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा बृहमुंबई ऐवजी आता अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व) पुणे शहर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुधारीत पत्रानुसार, सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र या ऐवजी आता विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Amitabh Gupta
Aditya Thackeray : संजय राऊतांसाठी आदित्य ठाकरेंनी सोडली खुर्ची; अन् थोरातांनी हाताला धरून बसवले

तसेच मानवी हक्क विभागाचे विशेष मूळ पोलीस महानिरीक्षक असलेले रवींद्र शिसवे यांची बदली लोहमार्ग आयुक्त मुंबई या पदावर झाली आहे. तर संजय मोहिते यांची सहपोलीस आयुक्त नवी मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे. सुरेश कुमार मेंगडे मुख्य दक्षता अधिकारी सिडको नवी मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.

मनोज लोहिया सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या पदावर नियुक्ती आहे. तर सुहास वारके विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा आणि सुव्यवस्था बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे. संजय दराडे अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com