भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिराळेंचा राष्ट्रवादीतील हा नेता आवडता...

'सरकारनामा'तर्फे दिवाळीनिमित्त राजकीय नेत्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात आमदार शिरोळे बोलत होते.
आमदार सिद्धार्थ शिरोळे
आमदार सिद्धार्थ शिरोळेसरकारनामा

पुणे : काम करण्याची पद्धत, रोखठोकपणा, हजरजबाबीपणा आणि प्रशासनावरील वचक यामुळे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे माझे ‘आयडॉल’ आहेत, अशी भावना भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बोलून दाखविली.

'सरकारनामा'तर्फे दिवाळीनिमित्त राजकीय नेत्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात आमदार शिरोळे बोलत होते.राजकीय चर्चांसोबत कौटुंबिक स्तरावर दिवाळी नेते कशी साजरी करतात याविषयी नेत्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून बोलते करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, काँग्रेसचे आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे आणि सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. शिरोळे यांनी भाजपाचे सर्वेसर्वा असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचेही शिरोल यांनी आवर्जून सांगितले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुण्यात कसब्यातील महिला मतदारांची जिल्ह्यात आघाडी

शिरोळे म्हणाले, ‘‘नशिबात असले की काहीही होऊ शकते. अगदी ३२ व्या वर्षापर्यंत मला मी राजकारणात असेल असे वाटलेही नव्हते. पण आज चाळीशीत मी भाजपकडून आमदार आहे. हॉटेल व्यवसायात माझे अजूनही मन रमते. राजकारणात प्रवेश करेपर्यंत मी अगदी उत्तम हॉटेल व्यावसायिक होतो. राजकारणात आल्यानंतर नागरिकांची सेवा हा एकमेव हेतू ठेवून काम करत आहे. पहिल्यांदा आमदार असल्याने विधानभवनात बऱ्याच नेत्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रशासकीय कौशल्य, तर चंद्रकांत पाटील यांच्याकडून संघटन कौशल्य शिकण्यासारखे आहे.

आमदार सिद्धार्थ शिरोळे
पीएमपीच्या १० हजार कर्मचाऱ्यांचा बोनस अजून अधांतरीच

गेल्या दोन वर्षापासून पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांनी प्रशासनावरील पकड मजबूत आहे. अजित पवार हे दर शुक्रवारी कोरोनाविषयी बैठक घेतात. तेथे मला त्यांच्या कामाची अधिक ओळख झाली. काम घेऊन आलेल्या प्रत्येक माणसाला ते ‘ॲटेंड’ करतात. त्याचे काम तातडीने होण्यासाठी प्रयत्न करतात. लगेच अधिकाऱ्यांना किंवा संबंधितांना फोन करतात. त्यामुळे काम घेऊन येणारा माणूसही अजितदादांकडे हक्काने येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मी त्यांना ‘आयडॉल’ मानतो. मात्र, पुणे महानगरपालिकेत पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता राखणे हे आमचे लक्ष्य असल्याचे शिरोळे यांनी आवर्जून सांगितले.

'ए जिंदगी गले लगाले...'

दिवाळीत कुटुंबासोबत वेळ घालविणे आवडत असल्याचे सांगत सिद्धार्थ शिरोळे यांनी शंकरपाळी हा आवडीचा पदार्थ असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी 'सदमा' या चित्रपटातील 'ए जिंदगी गले लगा ले' हे गाणे देखील म्हणून दाखविले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com