Siddharth Shirole : आमदार शिरोळे म्हणाले, 'शिवाजीनगर मतदार संघातील चॅलेंजेस् मलाच माहिती...'

BJP MLA from Pune Siddharth Shirole said that the fake narrative of the opposition will fail : पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्याची रणनीती सांगत, विरोधकांचा फेक नरेटिव्ह फेल होणार असल्याचं म्हंटलं.
Siddharth Shirole1
Siddharth Shirole1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी तिसऱ्यांदा विजयाची तयारी केली आहे.

'गुंतागुतींच्या या विधानसभा मतदार संघावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष आहे. या मतदार संघातील चॅलेंज मलाच माहिती असून, तिथं आतापर्यंत केलेली विकास कामे माझ्या साथीला आहेत. त्यामुळे विरोधकांचा फेक नरेटिव्ह भाजपच्या विकासाच्या विजय रथाला रोखू शकत नाही', असा टोला आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला.

भाजप (BJP) आमदार शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदार संघाचा कानाकोपरा असल्याचे सांगत अख्खा मतदारसंघ आणि तेथील अडचणींवर कशी मात करायची, याची रणनीती सांगितली. वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, वसाहतीकरण, आर्थिक विकास, बेरोजगारी, व्यवसायिकरण वाढलं आहे. वाहतूक कोंडीचा सोल्यूशन 2025 पर्यंत नक्कीच निघेल, तशी कामं देखील केली आहेत. त्यामुळे विजयरथ विरोधकांना रोखणं शक्य नाही, असा दावा आमदार शिरोळे यांनी केला आहे.

Siddharth Shirole1
Mahavikas Aghadi NCP News : जागावाटप झालेले नसताना 'मविआ'तील राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडसाठी मुलाखती घेतल्याने चर्चांना उधाण!

आमदार शिरोळे म्हणाले, "2009 मध्ये शिवाजीनगर अस्तित्त्वात आला. इथं पहिला आमदार काँग्रेसचा (Congress) होता. हा भाग वस्त्यांचा आणि उच्चभ्रू वसाहतींचा भाग आहे. तिथं दोन वेगवेगळ्या विचारांची भिन्न मतदार आहेत. 2019 मध्ये पाच हजार मतांनी निवडून आलो. लोकसभा निवडणुकीत साडेतीन हजारांचे मताधिक्य दिलं. 30-35 टक्के विरोधात, तर 35-40 टक्के आपल्या बाजूचा विचार, अशी या मतदार संघाची गणितं आहेत. निवडणूक कशी लढता, यावर बरंच काही अवलंबून असते. निकाल देखील अवंलबून असणार आहे".

या मतदारसंघात आपण दोन वेळा पुढे राहिलो आहे. 2014 आणि 2019 मध्ये आपण जिंकलो आहे. लोकसभेला देखील पुढे राहिलो आहे. हा मतदारसंघ खूप जवळचा निकाल देणारा आहे. मतदारसंघात सर्वात जास्त गुंतून घेतलं असल्यानं तिथली चॅलेंज माहिती आहे. आता त्यात गुंतलो असल्याने आणि तिच घेऊन निवडणुकीला समोरे जाणार असल्याचे विजय सोपा होईल, असा दावा आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

Siddharth Shirole1
Pune Hit And Run : पुणे पुन्हा हादरलं! आलिशान कारची दुचाकीला धडक; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

मी मतदार संघाचा कार्यकर्ता

भाजपमध्ये संख्यात्मक स्ट्रॅटेजीचा खेळ अधिक असतो. एकनाथ शिंदेंना बरोबर घेणं, त्यानंतर अजितदादांना बरोबर घेतलं. पुढे मनोज जरांगे फॅक्टर समोर आला. पक्ष हे मुद्दे विधानसभा निवडणुकीला कसे हाताळणार? यावर शिरोळे म्हणाले, "मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतला आहे. हा निर्णय किती योग्य आणि अयोग्य हे पक्षपातळीवर गांभीर्याने विचार असल्याचं चालू आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हा निर्णय हाताळत आहेत."

माझा राजकीय जन्म भाजपमधला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ता म्हणून, पक्षातील या निर्णयांना आम्ही देखील समोरे गेलो आहोत. नागरिकांमध्ये याच्या प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत, त्या आम्ही पक्षश्रेष्ठींना देखील कळवल्या आहेत. पण, त्यात जास्त गुंतून पडलो नाही. आमदार म्हणून मी माझ्या मतदारसंघात काम करत राहिलोय. निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे, ते त्यांचे निर्णय आहे. माझा निर्णय माझ्या मतदार संघापुरता आहे. मी माझ्या मतदार संघाचा कार्यकर्ता आहे. मतदारांचे प्रभुत्व माझ्यावर आहे. मी कार्यकर्ता म्हणूनच तिथं काम करतो. काम करत राहयचं आणि तेथून पुढं कसं जायचं, यावर कार्यकर्ता म्हणून अधिक माझं लक्ष असते, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी, सोल्यूशन 2025 पर्यंत 'फिक्स'

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुण्यामधील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ शहरी आणि वस्ती, असा दिसतो. यामुळे मतदारसंघात वेगवेगळी चॅलेंज दिसतात. हा मतदारसंघ पुण्याच्या मध्यभागी येतो. पुण्याकडे येणारे लोंढे वाढतच राहणार. देशातील आर्थिक उलाढालीचं पुणे हे आता महत्त्वाचं शहर बनलं आहे. त्यामुळे इथले चॅलेंज वाढली आहेत. शहरी भागात प्रामुख्याने वाहतूक कोंडीसारखा विषय खूपच संवेदनशील बनला आहे. हा मुद्दा उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीयांना भिडतो. तर वस्तीमधील मतदारांना हा प्रश्न असून नसल्यासारख दिसतो.

वस्तीतून आतापर्यंत वाहतूक कोंडीविषयी एकानं प्रश्न उपस्थित केलेला नाही. परंतु अशा संवेदनशील विषयावर, वाहतूक कोंडीचा प्रश्नावर निरंतर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोची सुरू असलेली काम, इंटिग्रेशनचे काम, पब्लिक ट्रान्सपोर्टवर मोठ्याप्रमाणात काम सुरू आहे. शिवाजी-हिजोंडी मेट्रो, खडकीचं ओल्ड मुंबई-पुणे रस्त्याचं काम, मेट्रोच विस्तारणारं झाळ, पुणे बस वाहतूक, मेट्रो इंटीग्रेशनचे कामं सुरू असून, हा प्रश्नाच संपूर्ण सोल्यूशन 2025 पर्यंत ही निघेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितलं.

वसाहतीकरणाचा वेग आणि विकास

याशिवाय वस्तीसाठी 'एसआरए' नवीन पाॅलिशी लागू होतेय, अशी माहिती देखील आमदार शिरोळे यांनी दिली. पाटील इस्टेटमध्ये एक निविदा मंजूर झाली आहे. 'एसआरए'ला गती येईल. बांधकाम व्यावसायिकांना देखील 'टीडीआर'ला विकता येणार आहे. मुलभूत सुविधांवर अधिक भर देता येणार आहे. मुलभूत सुविधांवर अधिक काम करावे लागत राहणार आहे. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्याच्या टाक्या उभ्या राहत आहे. पाण्याचा 40 टक्के अपव्यय होत आहे. ते रोखण्याचं आव्हान आहे. त्यावर देखील काम सुरू आहेत. रेन वाॅटरवर देखील काम करावं लागणार आहे. या विषयात भविष्यात प्राथमिक काळजी खूप घ्यावी लागेल, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तशी सुरवात देखील केल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com