Pune News : कोथरुडमध्ये थरार; गुंड शरद मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या!

Sharad Mohol News: शरद मोहोळच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
sharad mohol
sharad mohol Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. कोथरूड परिसरात शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडल्याचे समजते. गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले आहेत. पुण्यातील गँगवाॅर प्रकरणातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

शरद हिरामण मोहोळ (वय ४०, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात पुणे शहर, पिंपरी, तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून (Murder) केला होता.

नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high court) मोहोळला जामीन मंजूर केला आहे.

दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी शरद मोहोळला लागल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

sharad mohol
Sangli News: चंद्रहार पाटील 'वंचित' कडून? काँग्रेसच्या विशाल पाटलांचे काय होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com