Medha Kulkarni: भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दर्ग्यात घुसण्याचा प्रयत्न; मुस्लिम कार्यकर्त्यांना धक्काबुक्की?

BJP MP Medha Kulkarni Attempts Entry into Pune Dargah:खासदार ताईंना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल त्या बाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असताना केवळ स्टंट करुन दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण केली.
Medha Kulkarni News
Medha Kulkarni News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेघा कुलकर्णी यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्यासाठी छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यातील मस्जिदीत घुसुन गोंधळ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी हा आरोप केला आहे.

याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल डंबाळे म्हणाले, "हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक तसेच निंदनीय आहे. मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पध्दतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकीचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा व त्याव्दारे वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रकार असल्याची टिका राहुल डंबाळे यांनी केली.

हा संपुर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणारा असून यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. खासदार ताईंना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल त्या बाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक असताना केवळ स्टंट करुन दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण केली. या प्रकरणी कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे.

Medha Kulkarni News
Ranjit Kasale: कासले गिरवणार कराडचा कित्ता; पुणे पोलिस अलर्ट; VIDEO व्हायरल

यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांना मेधा कुलकर्णी यांच्याकडून धक्काबुक्की करणायात आली. परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाईट प्रसंग घडला नाही. या सर्व गोंधळापुर्वी त्यांनी छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा विषयी चिथावणी देणारी विधाने त्यांच्या भाषणातुन केली असल्याचा आरोप देखील डंबाळे यांनी केला आहे. यासंदर्भात छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टकडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

पुण्याची शांतता बिघडविणाऱ्या या राज्यसभा खासदार डॉ मेघा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत मेधा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्या सध्या दिल्लीमध्ये असून पुण्यामध्ये आल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com