मोठी बातमी : रशिया-युक्रेन युध्दात आता गुगल, टि्वटर, युट्युबची एंट्री

गुगलच्या पाठोपाठ युट्युबनेही रशियाच्या सरकारी मीडिया संस्थांच्या (state media)चॅनेलवर बंदी घातली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून होणारी कमाई युट्युबने थांबवली आहे.
russia ukraine war
russia ukraine warsarkarnama
Published on
Updated on

पुणे : रशियाने युक्रेनवर केलेल्या (Russia-Ukraine War) हल्ल्यानंतर गुगलने (Google)ने सोशल मीडियाच्या माध्यमातून रशियाच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. गुगलनं रशियाच्या विरोधात मोठं पाऊल उचलले आहे.

गुगलने रशियाच्या सर्व प्रसारमाध्यमांचे अकाउंट बंद (Demonetize)करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे जाहीरात प्रसारण (Ban Running Ads)करण्यास बंदी घालण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. गुगलच्या पाठोपाठ युट्युबनेही रशियाच्या सरकारी मीडिया संस्थांच्या (state media)चॅनेलवर बंदी घातली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून होणारी कमाई युट्युबने थांबवली आहे.

सोशल नेटवर्क सुरक्षा धोरणाच्या प्रमुख नथानिएल ग्लीचर म्हणाल्या, ''रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई केल्यामुळे फेसबुकने रशियाच्या सर्व जाहीराती, व्हिडिओचे प्रसारण बंद केले आहे,'' आपल्या टि्वटमध्ये नथानिएल ग्लीचर म्हणतात, ''जगातील आमच्या डिजिटल व्यासपीठावर रशियाला बंदी घातली आहे. युक्रेनमधील युद्ध परिस्थितीवर आमची नजर आहे. युक्रेनच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज आहोत,''

russia ukraine war
russia ukraine war : महाराष्ट्रातील २७ विद्यार्थी सुखरूप परतले!

टि्वटने शनिवारी आपल्या युझर्सला याबाबत माहिती दिली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरात थांबविण्यास सांगितले आहे. ''रशियातील काही व्यक्तींचे टि्वट अकाउंट बंद करण्यात येत आहेत. आमची सेवा उत्तम देण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,'' असे टि्वटरने स्पष्ट केले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आता जागतिक स्वरुप घेत आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचा चौथा दिवस उजाडला आहे. रशियाविरोधात (russia)जगातले इतर देश एकत्र येत असल्याचे समोर येत आहे. जागतिक पटलावरील तणावात भर पडण्याची शक्यता आहे.

russia ukraine war
russia ukraine war : जो बायडन यांनी सूचवले दोन पर्याय

अमेरिका, ब्रिटनसह 28 देशांनी युक्रेनला (ukraine)वैद्यकीय साहित्यासह लष्करी मदत देण्याचे मान्य केले आहे. यासोबतच या देशांनी युक्रेनला शस्त्र उपलब्ध करून देण्याबाबतही सहमती दर्शवली आहे. अनेक देशांनी विविध प्रकारचे निर्बंध रशियावर लादले असून, आता युक्रेनच्या मदतीलाही काही राष्ट्रे धावून आली आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता दोन देशांपुरते मर्यादित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण जग युद्धाच्या खाईत ढकलले जाण्याची चिन्हे आहेत.

रशियाकडून दिवसेंदिवस होत असलेल्या हल्ल्यांची तीव्रता वाढतच आहे. त्यातच आता रशियाला त्यांची आण्विक शस्त्र तैनात करण्यासाठी बेलारूसने आपला भूभाग उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com