Prakash Ambedkar On BJP : देशाच्या राजकारणात अजित पवार लहान 'प्लेअर'; आंबेडकर स्पष्टच बोलले

Ajit Pawar And Amit Shah : पुढील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार
Prakash Ambedkar, Amit Shah, Ajit Pawar
Prakash Ambedkar, Amit Shah, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar On Ajit Pawar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आपली राजकीय भूमिका कायम स्पष्टपणे मांडतात. यापूर्वीही त्यांनी शरद पवार भाजपसोबत जातील अशी जाहीर वक्तव्ये केली आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील पडलेली फूट ही औटघटकेची ठरणार असल्याचेही भाकीत त्यांनी केले. तसेच देशाच्या राजकारणात उपमुख्यमंत्री छोटे 'प्लेअर' असून भाजपचा मोठा डाव असल्याचे आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले आहे. (Latest Political News)

प्रकाश आंबेडकर हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एका वर्षात पुन्हा एकत्र येईल, असे भाकीतही वर्तवले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, "अजित पवारांना यंदा एकट्यालाच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. पुढील वर्षी मात्र ते कुटुंबात दिवाळी साजरी करतील, अशी आपण अपेक्षा धरू."

Prakash Ambedkar, Amit Shah, Ajit Pawar
NCP MLA News: शरद पवार की अजितदादा; राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिताफीने काढला मार्ग

भाजपच्या राजकारणाला विरोधक बळी पडत असल्याची खंतही यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केली. देशाच्या राजकारणात अजित पवार लहान प्यादे असल्यचाही आंबेकरांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "कर्नाटकमध्ये लोकसभेला मोठा फटका बसणार असल्याची जाणीव भाजच्या वरिष्ठांना होती. ती कसर भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सूचना आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा जिंकण्याचे आदेश आहेत. यातूनच राज्यात विरोधकच ठेवायचा नाही ही भाजपची रणनीती असून फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. अजित पवार देशाच्या राजकारणातील छोटेसे प्लेअर आहेत."

Prakash Ambedkar, Amit Shah, Ajit Pawar
NCP MLAs Meet Sharad Pawar: शरद पवारांची भेट कशासाठी; संभ्रम निर्माण करणे अन् कारवाईची धार कमी करण्यासाठीच ?

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली. सरकारला सामान्य जनतेचे काही पडलेले नाही. त्यांना आपली राजकीय पोळी भाजायची असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आंबेडकर म्हणाले, "राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवारांची चर्चा आहे. त्यांच्या गोंधळात शेतकरी सगळ्यात शेवटी गेला आहे. सरकारला सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काहीही पडलेले नाही."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com