
Pune News, 31 May : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत भाजपकडून सर्वे करण्याची पद्धत सुरू झाली आहे.
भाजपकडून विविध स्तरावर हे सर्वे करण्यात येतात आणि या सर्वेच्या निकषांच्या आधारेच उमेदवारी निश्चित करण्यात येत असल्याचं मागील काही निवडणुकीत पाहायला मिळालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देखील भाजपकडून आता या सर्वे ला सुरुवात करण्यात आली आहे.
भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तीन सर्वे करण्यात येणार आहेत. त्यातील पहिला सर्वे आता समोर आले आहे. या सर्वेतून अनेक प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावरतीच निवडणूक लढवावी अशी भूमिका वरिष्ठांपासून स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घेतली असल्यास पाहायला मिळत आहे.
स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तरी भाजपकडे प्रत्येक प्रभागांमध्ये चार जागांसाठी तब्बल 16 ते 20 इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन असल्याचं पाहायला मिळात आहे. त्यामुळे भाजपने इच्छुकांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी केली आहे. यामध्ये माजी नगरसेवकांना पहिल्या गटांमध्ये ठेवण्यात आला आहे.
मात्र भाजपकडून (BJP) करण्यात आलेल्या पहिला सर्वे मध्ये 2017 मध्ये निवडून आलेल्या 40 माजी नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा वाजली असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे महापालिकेमध्ये 2017 साली झालेल्या निवडणुकीनंतर तब्बल 100 नगरसेवक भाजपचे होते. जवळपास सगळेच यंदा देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपच्या पहिल्या सर्वे मध्ये यातील 40 जणांसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
पहिल्या सर्वेमध्ये काही माजी नगरसेवकांची लोकप्रियता घटली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यंदाची महापालिकेसाठीची उमेदवारी केवळ सर्वेक्षणाच्या निकषांवर दिली जाणार असल्याने या माजी नगरसेवकासाठी धोक्याची घंटा वाजल्या की बोलले जात आहे. त्यामुळे लोकप्रियता गमावलेले, जनतेशी संपर्क नसलेले किंवा कार्यक्षमतेत मागे पडलेले माजी नगरसेवक बाजूला ठेवले जाणार आहेत.
पक्षाला पुन्हा एकदा पुणे महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवायची असून त्यासाठी जिंकू शकतील अशा उमेदवारांनाच तिकीट दिलं जाणार आहे. हे सर्वेक्षण तीन पातळ्यांवर करण्यात येणार असून केंद्रीय, प्रदेश पातळी आणि संघटनात्मक पातळीवरती ही सर्वेक्षण होणार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप इच्छुकांना तीन कसोट्या पार कराव्या लागणार आहेत.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील भाजपने उमेदवारी निश्चित करण्यासाठी अशाच प्रकारची सर्वेक्षण केली होती. हे सर्वेक्षण आधारभूत ठरवत विधानसभेची आणि लोकसभेची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. आता हाच फॉर्मुला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील वापरण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.