BJP Replay To Fauzia Khan : खासदार फौजिया खान यांच्या महिला आरक्षणाच्या विधेयकावरील टीकेवर भाजपचा खोचक पलटवार

Maharashtra Politics : महिलांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या नऊ वर्षात केले आहे.
Umesh Deshmukh - Fauzia Khan
Umesh Deshmukh - Fauzia KhanSarkarnama
Published on
Updated on

Pune : भारतीय जनता पक्षाचा स्वच्छ हेतू असता तर त्यांनी हे विधेयक नऊ वर्षांपूर्वी आणले असते व आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली असती. मात्र, भाजपने निवडणुकीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले आहे. मात्र, आता आणलेले महिला आरक्षण विधेयक हा भाजपचा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान यांनी केली होती. या टीकेला आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख(Umesh Deshmukh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा सदस्य खासदार फौजिया खान यांच्यावर गुरुवारी निशाणा साधला आहे. देशमुख म्हणाले, केंद्र शासनाने महिलांना न्याय देण्यासाठी लोकसभेत मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा सदस्य खासदार फौजिया खान यांनी या विधेयकावर केलेली टीका अनाठायी तर आहेच शिवाय एका ज्येष्ठ महिला नेत्यांनी अशा पद्धतीने अपरिपक्व विधान करणे आश्चर्यजनक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Umesh Deshmukh - Fauzia Khan
Bawankule On Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य; पण बावनकुळेंनी मागितली अजित पवारांची माफी

डॉ. देशमुख म्हणाले, नऊ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएकडे राज्यसभेत बहुमत नव्हतं. त्यामुळे महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर होण्याची शक्यता नव्हती. पंतप्रधानपदी अटल बिहारी वाजपेयी असताना हे विधेयक ज्यावेळेस सभागृहात सदर झाले त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नेमकं काय केलं? हे एकदा फौजिया खान(Fauzia Khan) यांनी सांगितलं पाहिजे.

महिलांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या नऊ वर्षात केले आहे. घर नोंदणी करताना गृहिणींचे नाव समाविष्ट करणे,बँक खाते 11 कोटी गृहिणींना उज्वला गॅस मोफत कनेक्शन यासारख्या योजनांनी महिलांचे आयुष्य बदलले आहे. खासदार फौजिया खान आणि त्यांच्या नेत्यानी महिलांसाठी नेमके काय केले हे ते सांगू शकतील का? हे जर सांगता येत नसेल तर त्यांच्या बडबडीला तोंडाची वाफ वाया घालवणे यापेक्षा जास्त महत्त्व देता येणार नाही असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

फौजिया खान काय म्हणाल्या होत्या...?

भारतीय जनता पक्षाने सादर केलेले महिला आरक्षण विधेयक(Women Reservation Bill) हे केवळ चुनावी जुमला आहे. महिलांविषयी त्यांना तळमळ असती तर त्यांनी नऊ वर्षापूर्वीच हे विधेयक आणले असते व आतापर्यंत त्याची प्रक्रिया होऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजवणी सुध्दा झाली असती. जनगणना व सर्व प्रक्रिया पाहता २०२९ पर्यत महिला आरक्षण प्रत्यक्षात येणे कठीण वाटत आहे.

मागील सत्तावीस वर्षांपासून अडगळीत पडलेले महिला आरक्षण विधेयक नऊ वर्षांपूर्वी आणले असते, तर त्यामागे स्वच्छ हेतू आहे, असे म्हणता आले असते. मात्र, आता आणलेले महिला आरक्षण विधेयक हा भाजपचा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाच्या राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान यांनी केली होती.

Umesh Deshmukh - Fauzia Khan
Tanaji Sawant News : आरोग्यमंत्री सावंतांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाची 'होऊ दे चर्चा'...! खासदार ओमराजेंनीही साधलं 'टायमिंग'

तसेच भारतीय जनता पक्षाचा स्वच्छ हेतू असता तर त्यांनी हे विधेयक नऊ वर्षांपूर्वी आणले असते व आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली असती. मात्र, भाजपने निवडणुकीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले असल्याची टीका खान यांनी केली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Umesh Deshmukh - Fauzia Khan
Bawankule On Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य; पण बावनकुळेंनी मागितली अजित पवारांची माफी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com