Kasaba By-Election : कसब्यात ब्राह्मण उमेदवार देण्यासाठी भाजपाने पुनर्विचार करावा; आनंद दवेंची मागणी

Hemant Rasane : ब्राम्हण समाजात नाराजी पसरल्याची दिली माहिती
Anand Dave
Anand DaveSarkarnama
Published on
Updated on

Bramhan Community News : पुण्यातील कसबा विधानसभेचे यापूर्वी गिरीश बापट (Girish Bapat), तर त्यानंतर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी नेतृत्व केलं. हा मतदार संघ ब्राम्हण समाजातील उमेदवारांना साथ देणारा असल्याचं यापूर्वी स्पष्ट झालं आहे. आता मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदार संघात पोटनिवडणूक लागली आहे. भाजपनं काल रात्री येथील उमेदवारही जाहीर केला. त्यानंतर ब्राम्हण समाजात मात्र तीव्र नाराजी पसरल्यांचं सांगण्यात येतंय.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना भाजपच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीचा (MVA) उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. दरम्यान कसब्यात ब्राम्हणेत्तर उमेदवार दिल्याने हिंदू महासभेच्या (Hindu Mahasabha) वतीने ब्राम्हण समाजाच्या तीव्र भावना निर्माण झाल्याचे सांगिण्यात येत आहे. याबाबत हिंदू महासभेच्या वतीने एक चित्रफित प्रसारित करण्यात आली आहे.

Anand Dave
Chinchwad by-election : ''जगताप कुटुंबात वाद ही विरोधकांनी उठवलेली वावटळ, शंकर जगताप हे मला मुलासारखे''

यावेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी कसबा पोटनिवडणुकीतील भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी पसरल्याचे सांगितले. तसेच भाजपकडून चिंचवडमध्ये न्याय तर कसब्यात अन्याय केल्याचा आरोपही यावेळी केला.

आनंद दवे म्हणाले, "जो न्याय भाजपकडून चिंचवड (Chinchwad) मतदार संघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जागताप यांच्या कुटुंबांस दिला तोच न्याय कसब्यातून टिळक कुटुंबियांना मिळेल, अशी अपेक्षा होती. जातीपेक्षा धर्माचं जास्त काम करीत असतानाही प्रत्येक जातीना योग्य न्याय मिळाला, अशी आमची भूमिका आहे."

Anand Dave
Nana Patole : 'तांबेंचा हायव्होल्टेज ड्रामा, माझ्याकडे ही खूप 'मसाला' : पटोलेंचा सूचक इशारा!

पुढं बोलतना ते म्हणाले, "पुणे जिल्ह्यात २१ मतदार संघ आहेत. त्यातील कोथरूड आणि कसबा असे दोन विधानसभा मतदार संघाचं उमेदवार हे ब्राम्हण समजाचे नेतृत्व करीत होते. ते ब्राम्हण समाजाच्या व्यथा, वेदना व्यवस्थित मांडत होते. आता या उमेदवारीच्या प्रकरणामुळं टिळक कुटुंबाचं राजकारण संपल्यात जमा आहे. यामुळं ब्राम्हण समजात (Bramhan Community) तीव्र नाराजी पसरली आहे", असं दवे यांनी स्पष्टच बोलून नाराजी व्यक्त केलीय.

Anand Dave
Chinchwad by-election : ''जगताप कुटुंबात वाद ही विरोधकांनी उठवलेली वावटळ, शंकर जगताप हे मला मुलासारखे''

यानंतर दवे यांनी भाजपने कसब्यातील उमेदवारीचा पुनर्विचार करण्याचीही मागणी केली आहे. यावेळी दवे म्हणाले, "ब्राम्हण समाजाने हिंदू महासभेकडे (Hindu Mahasabha) त्यांच्या भावना पोहचविल्या आहेत. त्यामुळं पक्षानं उमेदवारीबाबत पुनर्विचार करावा. तसा तो पक्षाचा निर्णय आहे. दरम्यान ब्राम्हण समाज नाराज आहे. हिंदू समाजातील कोणताही समाज हा नाराज असू नये, प्रत्येकाला प्रतिनिधीत्व मिळावं, अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे", असंही दवे यांनी यावेळी वक्तव्य केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com