BJP : उर्फीसाठी वेळ पण, माझ्यावरील अन्याय पक्षात ऐकलं जात नाही : अंधारे-चाकणकरांसमोर महिलेने मांडली व्यथा!

Rupali Chakankar : भाजपच्या माजी शहराध्यक्षावर महिलेने केले आरोप!
Rupali Chakankar Sushma Andhare
Rupali Chakankar Sushma Andhare Sarkarnama

Sushma Andhare : वेगवेगळ्या पेहरावांमुळे कायम प्रसिद्धीत राहणारी उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा वाद आता वेगवेगळी वळणे घेत आहेत. वाघ यांना राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अधारे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासमवेत भाजपची पदाधिकारी आणि भाजपच्या माजी शहराध्यक्षांसोबत असलेल्या संबंधामुळे चर्चेत आलेल्या महिला यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक आरोप लगावत, आपली व्यथा मांडली.

सुषमा अंधारे आणि रूपाली चाकणकर यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत एक महिला म्हणाली, उर्फी जावेदबाबत बोलायला भाजप पक्षामधील नेत्यांना खूप वेळ आहे, मात्र मी स्वत: भाजपची पदाधिकारी आहे, भाजपमध्ये काम करते, पण माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलायला, मला न्याय मिळवून द्यायला पक्षातील लोकांकडे वेळ नाहीये. भाजपचा माजी शहराध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. मला खोटे-नाटे आमिष दाखवून, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं व माझं शोषण केलं, असा आरोप महिलेने यावेळी केला.

Rupali Chakankar Sushma Andhare
Aimim : इम्तियाज जलील यांनी यासाठी मानले न्यायालायाचे आभार..

महिला पुढे म्हणाली, "पक्ष आणि पक्षातील नेते माझं काहीच ऐकत नाहीयेत. आता या पत्रकार परिषेदेत मी माझ्या स्वच्छेने आले आहे. मी ज्या पक्षात काम करते, त्याच पक्षात माझं ऐकून घेतलं जात नाही. याबाबत मी मागील चार ते पाच महिने पक्षाची प्रतिष्ठा वाचवयचा प्रयत्न करत होते. पण, आज न्यायालयात माझे वकीलांनाही त्रास होत आहे. आज मी पुण्यामध्ये पोहोचले. सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क केला. यानंतरच विचाराअंती मी पत्रकार परिषदेत बोलत आहे. "

"पोलिसांकडे मी तक्रार नोंदवली आहे. याबाबत मी पाठपुरावाही करत आहे. मला देशमुख यांनी लग्नाचं आमिष दाखवलं होतं. शॉपिंग करुया असेही त्याने मला म्हटलं. शालू आणि साड्या घेऊ सांगितले. आम्ही रुमवर पोहचल्यानंतचर त्यांनी हृदयविकाराच्या झटक्याचे नाटक केले व रडले. यावेळी रडत बोलले की, मी टेन्शनमध्ये आहे. फोटो किंवा व्हिडिओ काढू देत असेल तरच लग्न करेल असे सांगितले, असेही या महिलेने सांगितले.

मला धक्कादायक अनुभव :

माझी नार्को-टेस्ट करण्यात यावी, मी नेहमी खरे बोलते. यासंबंधी मी आताच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून याबाबत मागणी केली. एक पिडीत महिला म्हणून मी पक्षातील नेत्याकडे मदत करण्यात यावी, म्हणून मागणी केली तर यावेळी मला धक्कादायक अनुभव आला. सांगलीतल्या एका नेत्याचा हा अनुभव धक्कादायक होता. उलट माझ्यावरच वेगवेगळे आरोप करण्यात आले. याचाही मला फार मानसिक त्रास झाला. यानंतर मी सुषमा अंधारेंकडे यांच्याकडे आले.

देशमुख यांचे सर्व रेकाॅर्डींग्ज माझ्याजवळ उपलब्ध आहेत. याचा माझ्या मनावर परिणाम होत आहे. माझा पक्ष उर्फी जावेदवर बोलू शकतो बोलतो परंतु, मात्र स्वतःच्याच पक्षातील महिला कार्यकर्तीवर झालेल्या अन्यायाबाबत मात्र बोलत नाही. राज्याचे मंत्री चंद्रकात पाटील यांना इतकंच सांगणं आहे की, माझा आवाज आज तरी ऐका, माझ्यावर झालेला अन्याय न्यायासयात प्रलंबित आहे. माझ्यावर अन्याय करण्यात आला मात्र श्रीकांत देशमुखांना नेहमी न्यायिक बाबातीत उसंत मिळत आहे.

Rupali Chakankar Sushma Andhare
BJPचे नामांकन आणि शक्तिप्रदर्शन; फडणवीस, बावनकुळे साधणार पदवीधरांशी संवाद !

नाते नाकारले जात आहे - सुषमा अंधारे

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, 'पिडीत महिला हिच्याशी श्रीकांत देशमुख यांच्यासोबत विवाह झाला आहे. मात्र या विवाहाचं नातं आता देशमुख यांच्याकडून नाकारले जात आहे. पिडीत महिला या केवळ भाजप सोलापूर जिल्हाध्यक्षाच्या पत्नीच नाही, तर भाजपच्या मुंबई प्रदेश युवती जनरल सेक्रेटरी पदावरसुद्धा कार्यरत आहेत.

अंधारे पुढे म्हणाल्या, भाजपकडे पिडीत महिलेने वेळोवेळी मदतीची याचना केली. हा पक्षाच्या आतली बाब आहे म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या बाबतीत मदत करणयात यावे, असे सांगितले. फक्त पक्षाच्या स्तरावर नाही, तर कुटुंबाच्या स्तरावरही त्यांनी मदतीची अपेक्षा केली होती, पण तिला साहाय्य केले नाही.

एखादीच्या कपडे, पेहरावावरून भाजपच्या महिला नेत्या बोलत आहेत. पण आपल्याच पक्षातील महिला पदाधिकाऱ्याला त्रास देण्यात येत आहे. सर्वच महिलांना पाहण्याचा चष्मा यांचा कसा आहे हे लक्षात येतंय. भाजपमधील पिडीत महिलेची व्यथा राज्याच्या गृहमंत्र्यांनी ऐकूण घ्यायला हवी, असे अंधारे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com