Pune Political News : कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकारांनी भाजपचे हेमंत रासनेंचा पराभव केला. ती सल भाजपच्या मनात अजूनही आहे. कसब्यात झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत भाजप आहे. त्यामुळे विधानसभेत रवींद्र धंगेकरांचा पराभव निश्चित आहे, असा दावा भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी 'सरकारनामा'च्या विशेष मुलाखतीत केला आहे.
कसब्यात भाजपचा (BJP) पराभव का झाला, त्याची कारणे देताना घाटे म्हणाले, पुण्यात २०१४ मध्ये आठ आमदार निवडून आले होते. त्यानंतर जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकरांचा पराभव झाला. मात्र त्यांच्या मताधिक्यात जास्त फरक नव्हता. तर पोटनिवडणुकीत कसब्यात धंगेकर निवडून आले. मात्र गिरीश बापट असताना कसब्यात तिरंगी लढत होत होती. आता थेट लढत झाल्याने मतांची विभागणी झाली नाही. त्याचा फटका भाजपला बसला. तसेच काही चुकाही झाल्या होत्या.
यावेळी घाटेंनी धंगेकरांना (Ravindra Dhangekar) खिंडीत गाठण्यासाठी भाजपने केलेल्या तयारीचा आढावाच घेतला. ते म्हणाले, कसब्याची जागा कायम भाजपकडे होती. ती गमावल्याने त्याची सल मनात आहे. पक्षसंघटना त्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. मागे झालेल्या चुका यावेळी टाळल्या जातील. या निवडणुकीला सर्व ताकदीने उतरण्याचे ठरवले आहेत. त्याची बुथलेव्हल तयारी सुरू झालेली आहे. यावेळी विजय कसा मिळवयाचा याचे नियोजन आहे. त्यामुळे कसब्याची जागा भाजपकडे घेण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कसब्यात आता कसल्याही स्थितीत आमदार निवडून आणण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती घाटेंनी दिली. पुण्यात आठही विधानसभांमध्ये महायुतीचे आमदार निवडून येतील. त्या दृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे. महाविजन २०२४ या मिशन खाली आम्ही तिनही पक्षांनी कामास सुरूवात केली आहे. यातच अजित पवार (Ajit Pawar) महायुतीसोबत आहेत. त्यामुळे कसब्यात १०० टक्के भाजपचा विजय होणार, यात काही शंका नाही.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.