Ajit Pawar Group : 'डीपीसी'मध्ये अजितदादांनी दाखवला हिसका; शिंदेंची शिवसेना वेटिंगवर, भाजपलाही धक्का

Sangli DPC appointments : अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह चौघांची सांगली नियोजन समितीवर वर्णी...
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

अनिल कदम

Sangli Political News :

जिल्हा नियोजन समितीवर (DPC) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या निवडी रखडल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह चार जणांची वर्णी लागली आहे. विशेष निमंत्रित म्हणून या सदस्यांच्या निवडी शासनाकडून जाहीर करण्यात आल्या.

मुख्यमंत्री शिंदे गटाच्या सदस्यांच्या निवडी होण्यापूवीं राष्ट्रवादीच्या चौघांची वर्णी लावून अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिवसेनाला धक्का दिला आहे. या निवडीमुळे शिंदेंची शिवसेना पुन्हा वेटिंगवर असल्याचे स्पष्ट झाले.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे पडले होते उद्धव ठाकरेंच्या पाया...

दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करीत भाजपसोबत युती केली आणि मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजप-शिंदे गट कार्यरत आहे. शासकीय समित्या असो अथवा जिल्हा नियोजन समितीवर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. मात्र सांगली जिल्हा नियोजन समितीवरील निमंत्रित सदस्यांच्या निवडी गटबाजीमुळे रखडल्या होत्या. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी डीपीसीच्या निमंत्रित सदस्यांच्या निवडी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे वेळोवेळी स्पष्ट केले होते. शिंदे गटानेही अनेक वेळा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. नियोजन समितीवर शिंदे गट वेटिंगवर असताना थेट अजित पवारांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर सांगली जिल्ह्यात अजित पवार गटाने ताकद वाढवण्यास सुरुवात केली. माजी आमदार सदाशिव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील आणि पद्माकर जगदाळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता.

अजित पवारांनी वैभव पाटील यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष, तर जगदाळे यांच्यावर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर अनेकजण अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश करू लागले आहेत. जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर अजित पवारांनी त्यांच्या चार समर्थकांची विशेष निमंत्रित म्हणून वर्णी लावून घेतली आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Yavatmal Shiv Sena : खासदार भावना गवळींवर किरीट सोमय्यांचा पुन्हा पलटवार

यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, सनमडीचे (ता. जत) सुनील पवार, करगणीच्या (ता. आटपाडी) पुष्पा जयवंतराव पाटील यांची निवड झाली आहे. शासनाचे उपसचिव नि. भा. खेडकर यांनी यासंदर्भातील अध्यादेश काढला आहे. सांगली जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या काही जणांची निवड करण्यात येणार होती. पण, पालकमंत्र्यांनी शिफारस केली नसल्याने या निवडी रखडल्या होत्या. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने बाजी मारत शिवसेना व भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde
Sangli Loksabha : संजयकाका गटबाजीच्या कचाट्यात; काँग्रेसचे विशाल पाटील एकीच्या एक्स्प्रेसवर स्वार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com