Pune Bjp : पुणे भाजपा शहराध्यक्षांची राज्य सरकारच्या विरुद्ध भूमिका ? पोस्टर लावत दर्शवला अप्रत्यक्ष विरोध

Political News : एकीकडे राज्य सरकार नव वर्ष साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
pune Banner
pune BannerSarkarnama
Published on
Updated on

Pune News : 31 डिसेंबर साजरा करता यावा आणि नववर्षाची सुरुवात आनंदात आणि मुक्त वातावरणात करता यावी म्हणून राज्य सरकारने मद्य विक्रीच्या वेळेमध्ये सूट दिली आहे. एकीकडे राज्य सरकार नव वर्ष साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते 1 जानेवारीला नववर्ष साजऱ्या करण्याच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.

तळीरामांच्या थर्टी फर्स्ट उत्साहावर विरजण पडू नये म्हणून राज्य सरकारने 31 डिसेंबरला पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्रीकरण्यास परवानगी दिली आहे, तर महानगरांमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत ही परवानगी असणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत देशी, विदेशी मद्य विक्री व बिअर विक्री सुरू राहणार आहेत.

pune Banner
Trinamool Congress : पंजाब अन् पश्चिम बंगालच्या चित्ररथाच्या मार्गात केंद्राचा खोडा; आप, तृणमूल काँग्रेसला झटका

सरकारच्या या निर्णयांवर विविध स्थरांतून टीका होत असताना आता पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी पुणे शहरातील मध्यवस्तीतील बहुतांश चौकामध्ये पोस्टर लावत एक प्रकारे नववर्षाच्या सेलिब्रेशनला आपला विरोध दर्शवला आहे.

भाजपा (Bjp) शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या पोस्टरमध्ये कॅलेंडर बदलले आहे. आपली संस्कृती नाही असे म्हणत आपले नववर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं. 31 डिसेंबरच्या मद्यधुंद रात्री नाही अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत सरकारनामाशी बोलताना धीरज घाटे म्हणाले की, 31 डिसेंबरला बहुतांश तरुण पाश्चात्त्य संस्कृतीचं अनुकरण करून असंस्कृतपणे नववर्षाचे सेलिब्रेशन करत असतात. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. त्यामुळे गेले 30 वर्ष मी असे फलक लावून पुणेकरांना आवाहन करण्याचा प्रयत्न करतो.

गुढीपाडव्याच्या मंगलमय पहाटे आपण नववर्षाचा उत्साह साजरा करावा. सरकारने 31 डिसेंबर संदर्भात कोणताही निर्णय घेतला असला तरी आपली संस्कृती हा वेगळा भाग असून ती जपण्याचा प्रयत्न करणं हे सर्वांचेच कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited By : Sachin waghamre)

pune Banner
Pune BJP News : मोहोळ-मुळीकांमध्ये 'इव्हेंट वॉर' ; भाजपच्या प्रचाराला सुरवात ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com