

Pune News: पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्षाची गाडी फोडत प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष असलेल्या वैभव सोलनकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी जोरदार दगडफेक केली. हल्लेखोरांपैकी एकाच्या हातात कोयता असल्याचा खळबळजनक दावाही सोलनकर यांनी केला आहे.
वैभव सोलनकर हे शनिवारी (ता.11 जुलै) शेटफळेगडे येथील शेतकऱ्यांची बैठक संपवून घरी परतत होते. याचदरम्यान, त्यांच्यावर पालखी महामार्गालगतच्या कान्हेरी रोडवर हा जीवघेणा हल्ला झाला.
दोन दुचाकींवरून आलेल्या अज्ञातांनी सोलनकर यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. हल्लोखोरांच्या दुचाकी या विना नंबरप्लेटच्या होत्या. तसेच त्यांच्यापैकी एकाच्या हातात कोयता असल्याचंही वैभव सोलनकर यांनी सांगितलं आहे. यावेळी हल्लेखोरांनी सोलनकरांच्या एका हातावर वार केल्याची माहिती समोर येत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. वैभव सोलनकरांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पोलिसांकडून फरार हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.