मुळीकांचे जगतापांना खुले आव्हान : राष्ट्रवादी नगरसेवकांचा भाजपत होणारा प्रवेश रोखून दाखवावा!

प्रशांत जगताप यांना आक्षेपार्ह आणि चुकीची विधाने करण्याची जुनी सवय आहे आणि त्यातूनच प्रसिद्धी मिळवण्याची त्यांची पद्धत आहे.
 Jagdish Mulik-Prashant Jagtap
Jagdish Mulik-Prashant JagtapSarkarnama
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना आक्षेपार्ह आणि चुकीची विधाने करण्याची जुनी सवय आहे आणि त्यातूनच प्रसिद्धी मिळवण्याची त्यांची पद्धत आहे. पण, केवळ प्रसिद्धी मिळवून निवडणुका जिंकता येत नाहीत. भाजपच्या १६ नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत जगताप जे बोलत आहेत, मी त्यांना आव्हान देतो की, तुमचे जे ४०-४४ नगरसेवक आहेत, त्यांचा भाजपमध्ये होणार प्रवेश थांबवा आणि त्यानंतरच तुम्ही भाजपच्या नगरसेवकांबद्दल बोला, असे खुले आव्हान भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी जगताप यांना दिले. (BJP's Jagdish Mulik challenges to NCP's Prashant Jagtap)

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यात राष्ट्रवादी १२२ जागा जिंकेल असा दावा केला होता. तसेच, भाजपच्या १६ नगसेवकांनी संपर्क साधल्याचे सांगितले होते. त्याला भाजपचे मुळीक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 Jagdish Mulik-Prashant Jagtap
टिळेकरांना अडचणीत आणण्याची चेतन तुपेंनी साधली संधी...

जगदीश मुळीक म्हणाले की, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांच्या वल्गना आज (ता. १ फेब्रुवारी) ऐकायला भेटल्या. ज्या पक्षाचे पुणे महापालिकेत ४०-४४ नगरसेवक आहेत, त्या पक्षाने महापलिकेत १२२ नगरसेवक निवडून आणण्याचे स्वप्न पाहावे, हे हास्यास्पद आहे. मुळात त्यांची ताकद किती आहे, कुठल्या भागात आहे, हे त्यांनी अगोदर तपासावे आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी अशा वल्गना कराव्यात.

 Jagdish Mulik-Prashant Jagtap
प्रभाग रचना जाहीर होताच भाजपच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीच्या जगतापांना फोन!

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी पुण्याची काय अवस्था केली, हे शहरातील नागरिकांना माहिती आहे. पुण्याची अवस्था बिकट करण्याचे काम राष्ट्रवादीच्या काळात झाले आहे. शहरातील अनेक प्रकल्प यांच्याच कार्यकाळात रखडले होते. तसेच, राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातच पुण्यात भ्रष्टाचार बोकाळला, हे पुणेकर कधीच विसरू शकत नाहीत, असे मुळीक यांनी नमूद केले.

 Jagdish Mulik-Prashant Jagtap
विशाल फटेच्या बायकोचे गंठण आणि कानातील रिंगाही पोलिसांकडून जप्त...

आक्षेपार्ह आणि चुकीची विधाने करण्याची राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची तर जुनीच सवय आहे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची. पण, केवळ प्रसिद्धी मिळवून निवडणुका जिंकता येणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षांत पुणे शहरात केलेली कामगिरी जनतेच्या समोर आहे. २४ बाय ७ प्रकल्प, भामा आसखेड पाणी योजना किंवा मेट्रो हे प्रकल्प भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहेत. कोरोनाकाळातही भाजप हाच नागरिकांसाठी लढत होता, हे जनता जाणून आहे, त्यामुळे पुणेकर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षालाच पसंती देतील, असा विश्वासही शहराध्यक्ष मुळीक यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com