Siddharth Shirole : मधुकर मुसळेंच्या माघारीने शिरोळेंचा मार्ग सुकर!

Shivajinagar Assembly Election: भाजपा नेतृत्वाशी चर्चेनंतर उमेदवारी मागे, कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर
Siddharth Shirole
Siddharth ShiroleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election: शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे मधुकर मुसळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या यशस्वी मुत्सद्देगिरीमुळे मुसळे यांनी सोमवारी (ता. ४) उमेदवारी मागे घेतली.

मुसळे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे, असा विश्वास या वेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

मधुकर मुसळे हे भाजपाचे (BJP) समर्पित कार्यकर्ते असून, त्यांनी स्मार्ट औंध साकारण्यासाठी अथकपणे काम केले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अनेक वर्षे भाजपाच्या मुशीत वाढलेल्या मुसळे यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्याच्या जोरावरच त्यांनी नगरसेवकपदापर्यंत मजल मारली होती. तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्यात ते नेहमी पुढे असतात.

Siddharth Shirole
Devendra Fadnavis: आताच्या परिस्थितीत मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल? फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...

तसेच औंध परिसर स्मार्ट बनविण्यासाठी अनेक कल्पक योजना कागदावरून प्रत्यक्षातआणण्यासाठी त्यांनी हिरिरीने प्रयत्न केले. त्यांच्या उमेदवारीमुळे या परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सोमवारी मुसळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे वातावरण निवळले असून, आता सर्व कार्यकर्ते एकदिलाने सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार करणार असल्याचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख दत्ता खाडे यांनी स्पष्ट केले.

Siddharth Shirole
Devendra Fadnavis: मनोज जरांगेंच्या निवडणुकीतून माघारीच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मधुकर मुसळे हे पक्षाचे जुने-जाणते कार्यकर्ते आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष व शेवटी मी, ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे, त्या संस्कारांचे परिपूर्ण पालन करीत मुसळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्यासोबतच राज्यात महायुतीची सत्ता यावी, यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद! असं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी म्हटलं आहे.

(Edite by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com