धक्कादायक! पंचायत समितीच्या कार्यालयात जादूटोण्याचा प्रकार? लिंबू-गुलाल अन् थरकाप उडवणारी चिठ्ठी, परिसरात खळबळ!

Mysterious note found on government officer's table : सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्याच्या टेबलवर लिंबू, गुलाल आणि धक्कादायक मजकूर असलेली चिठ्ठी आढळली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Maharashtra government office shocking incident
Maharashtra government office shocking incidentSarkarnama
Published on: 
Updated on: 

पुणे जिल्ह्यातील भोर पंचायत समिती कार्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या टेबलवर लिंबू, गुलाल, बुक्का आणि धमकीची चिठ्ठी आढळल्याने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कार्यालयात जादूटोणा किंवा भानामती करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, चिठ्ठीमध्ये संबंधित अधिकाऱ्याला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी कार्यालयात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर हा प्रकार निदर्शनास आला. टेबलवर लिंबू, गुलाल आणि बुक्का ठेवण्यात आला होता. त्यासोबत एक चिठ्ठीही आढळून आली. या चिठ्ठीत धमकीवजा मजकूर लिहिण्यात आला असून, त्यामध्ये गुरु आणि सहकाऱ्यांचाही उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Maharashtra government office shocking incident
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार, सात डिसेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात जाणार!

शासकीय कार्यालयात अशा प्रकारे जादूटोणा किंवा भानामतीसारखा प्रकार करणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला अशा पद्धतीने धमकावण्याचा प्रयत्न होत असेल, तर कार्यालयातील सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. या घटनेमुळे भोर पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, भोर पंचायत समिती कार्यालयातील या प्रकारामागे नेमके कोण आहे, संबंधित अधिकाऱ्याला धमकी देण्याचा उद्देश काय होता आणि या घटनेचा कार्यालयातील कामकाजाशी काही संबंध आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणामागील सत्य समोर येणार आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.