Arrested Terrorist In Pune : खळबळजनक! पुण्यात दहशतवाद्यांच्या घरात ड्रोनसह बॉम्ब साहित्य; एटीएसचा शोध सुरू!

Pune ATS Search Begins: दहशतवादी हे स्वत:ला ग्राफिक डिझायनर असल्याचे भासवीत होते.
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnma

Pune Crime News: पुण्यातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या कोंढव्यातून घरातून ड्रोन, बाँब तयार दोन दहशतवाद्यांच्या कोंढव्यातून राहत्या घरातून ड्रोन, बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, गुगलवरून मिळवलेली कुलाबा या ठिकाणी छाबडा हाउस आणि इतरही महत्त्वाची अन् संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे लॅपटॉपच्या स्टोरेजमध्ये तब्बल पाचशे जीबी डेटा जप्त केल्याची माहिती राज्य दहशतवादीविरोधी पथकाने दिलेली आहे.

दरम्यान, फरारी झालेला तिसरा दहशतवाद्यापर्यंत एटीएसचा पोहचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्या साथीदाराचे नावे पुढे आल्याची माहितीही समोर आली आहे. पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असलेलेहे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Pune Crime News
Ahmednagar Crime News : नगरमध्ये गुंडाराज अन् पोलिसांचं दुर्लक्ष; राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचा मोठा निर्णय

‘एटीएस’ने या प्रकरणात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) याला अटक केली. त्यानंतर पठाणला आर्थिक रसद पुरविणाऱ्या सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कौसरबाग, कोंढवा) याला रत्नागिरीहून शनिवारी अटक केली आहे.

आठवडाभरात महत्त्वाचे धागेदोरे हाती -

या प्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक केली आहे. तसेच, तपासात इतर काहीजणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात येत आहेत. दहशतवाद्यांनी ड्रोनमधून घेतलेले चित्रीकरण न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. तपासात येत्या आठवडाभरात महत्त्वाचे धागेदोरे हाती येतील, असे ‘एटीएस’चे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी सांगितले.

ते दोघे ग्राफिक डिझायनर नव्हते -

दहशतवादी हे स्वत:ला ग्राफिक डिझायनर असल्याचे भासवीत होते. परंतु त्यांचे प्रत्यक्षात बारावीपर्यंतही शिक्षण झालेले नाही. तरीही ते प्रशिक्षित दहशतवादी असून, त्यांनी बॉम्ब तयार करण्याचेही प्रशिक्षण घेतलेले आहे. ते कोंढवा परिसरात नाव बदलून राहत होते.

Pune Crime News
Pune Crime : ACP गायकवाड यांनी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या; स्वत:वरही गोळी झाडली..

अदनान अली अन॒ दहशतवाद्यांचे ‘कनेक्शन’ -

इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात ‘एनआयए’ने अटक केलेल्या डॉ. अदनान अली सरकार आणि पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांचे ‘कनेक्शन’ अद्याप समोर आलेले नाही. परंतु यापुढील तपासात नेमके काय निष्पन्न होईल, हे सांगू शकत नाही, असे ‘एटीएस’कडून सांगण्यात आले.

लॉज, हॉटेलचा वापर नाही -

या दहशतवाद्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील जंगलात बॉम्बस्फोट घडविण्याचे प्रात्यक्षिक घेतले. ते बाहेर राहण्यासाठी लॉज, हॉटेलचा वापर करीत नव्हते. त्यामुळे त्यांनी राहण्यासाठी तंबूचा वापर केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com