Pune By-Election:
Pune By-Election:Sarkarnama

Pune News: पुण्याची पोटनिवडणूक कधी? न्यायालयानं आयोगाला झापलं; निवडणूक घेणार की नाही ते सांगा अन्यथा...

Pune By Election: केंद्रीय निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल
Published on

Pune: खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार पद रिक्त आहे. पुण्याची पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पुणे लोकसभेसाठी निवडणूक घ्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आहेत.

असे कारण कसे देता...

"पोटनिवडणूक घेणार की नाही ते सांगा, अन्यथा आम्हाला आदेश करावा लागेल," अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आयोगाला फटकारले. पुणे पोटनिवडणुकीबाबत आयोगाला सोमवारी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. निवडणुका, पोटनिवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कामच आहे, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामावर परिणाम होईल ,असे कारण कसे देता, असा सवाल निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने विचारला आहे. "पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय घेताना तुमच्याकडून देण्यात आलेली कारणे सकृतदर्शनी अप्रस्तुत आहेत," असे न्यायालयानं म्हटलं आहे.

 Pune By-Election:
Pune Loksabha Byelection : या कारणांमुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक टाळली

हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य...

आयोगाने आठ ऑगस्ट २०२३ रोजी सहा राज्यांमध्ये विधानसभेच्या सात जागांच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला. त्याबरोबर पुण्याच्या लोकसभेची पोटनिवडणूक आयोगाने जाहीर केली नाही. या पोटनिवडणुकांची घोषणा केल्यानंतर तीन दिवसांनी आयोगाने केंद्र सरकारला पुणे आणि अन्य मतदारसंघांची पोटनिवडणूक न घेण्याचा प्रस्ताव पाठवला होता. याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार विधानसभा, विधान परिषद, लोकसभा किंवा राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेऊन त्या जागा भरणे, हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २८ सप्टेंबर २०२३ पूर्वी होणे आवश्यक होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार?

लोकसभेच्या निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पोटनिवडणूक जाहीर करणार का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पोटनिवडणुकीत राज्यातील सर्व राजकीय पक्ष काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गिरीश बापट यांना महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलं स्थान होतं. त्यामुळे बापट यांच्याच कुटुंबातील सदस्याची खासदारकीसाठी बिनविरोध निवड करण्यात येते, की पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार हे लवकरच समजेल.

 Pune By-Election:
Winter Session 2023 : फडणवीसांनी असे पत्र द्यायला नको होते; अजितदादांचे सहकारी नाराज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com