BJP Vs Shivsena UBT: भाजप अन् ठाकरेसेनेत 'बुक वॉर'; राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग'ला 'या' पुस्तकानं प्रत्युत्तर

Maharashtra Politics : संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाच्या माध्यमातून केलेल्या टीकेनंतर भाजपनंही पुस्तकाच्या माध्यमातूनच उत्तर दिलं आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये पुस्तक वॉर रंगणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sanjay Raut, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आर्थिक व्यवहारांबाबतच्या आरोपानंतर त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. या जेलमधील प्रसंग बाबत त्यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले आहेत.आता या गंभीर आरोपांना भाजपकडून देखील पुस्तकाच्या माध्यमातून उत्तर देण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहेत

संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाला भाजपच्या (BJP) "किंगमेकर क्रॉनिकल-वसुली व घोटाळ्यांचे पर्व" या पुस्तकाने प्रत्युत्तर देण्यात येणार आहेत. असुरी राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या संपादकाच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश, असं नावं या पुस्तकात देण्यात आला असून आज सायंकाळी या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात येणार आहे.

तब्बल अडीचशे पानांच्या असणाऱ्या या पुस्तकामध्ये भ्रष्टाचाराबाबतचे वीस धडे देण्यात आले आहेत. या धड्यांमध्ये महापालिकेतील ठेक्या संदर्भातील घोटाळे, बदल्यांमध्ये झालेले घोटाळे तसेच बार पब च्या माध्यमातून 100 कोटी रुपये जमवण्यासंदर्भातील घोटाळ्या बाबतची मालिका या पुस्तकामध्ये लिहिण्यात आली आली आहे.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Neelam Gorhe On Sanjay Raut : 'राऊतांनी पुस्तकाचं श्रेय स्वप्ना पाटकरांना द्यावं'; नीलम गोऱ्हेंनी वर्मावरच घाव घातला

या पुस्तकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्तेत असतानाच्या काळातील घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या घोटाळ्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे थेट नाव न घेता अंगुली निर्देशाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे.

स्वतःच्या असुरी राजकीय महत्वाकांक्षेपोटी असंख्य निष्पाप नागरिकांना जिवंतपणी नरकयातना देणा-या संपादकाच्या कृष्णकृत्यांचा परदाफाश या पुस्तकाच्या माध्यमातून करणार असल्याचं भाजपचे प्रवक्ते आणि पुस्तकाचे लेखक विनायक आंबेकर यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितला आहे.

Sanjay Raut, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
MVA government secrets : ...तर आघाडी सरकारमध्ये कोल्हापूरचा 'हा' रांगडा गडी गृहमंत्री झाला असता'; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

दरम्यान, संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून केलेल्या टीकेनंतर भाजपनं त्यांना देखील पुस्तकाच्या माध्यमातूनच उत्तर दिल्याने आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये पुस्तक वॉर रंगणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com